Take a fresh look at your lifestyle.

पैशांच्या दुष्काळापुढे नागरिक झालेत हतबल; पहा काय परिस्थिती ओढवलीय शेजारी देशावर

दिल्ली : म्यानमारमध्ये सैन्याने सत्ता हस्तगत करण्यास सहा महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. या सहा महिन्यात या देशात अनेक संकटे निर्माण झाली आहेत. सध्याच्या काळात देशात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशात रोख पैशांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. एटीएममधून पैसे काढायचे असतील तर साडे तीन वाजल्यापासून एटीएम बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. रोख पैसे नसल्याने लोकांना जास्त पैसे काढता येत नाहीत. खरेदी कमी होत आहे.

Advertisement

देशातील गंभीर आर्थिक संकटामुळे सरकार, बँक आणि अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. देशातील ग्रामीण भागात तर परिस्थिती जास्तच खराब आहे. धान्य आणि भाजीपाल्याच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तू देण्यात येतात. देशात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. शहरात लोक ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन मोटारसायकल, कॅमेरा यांसारख्या वस्तू विकतात. सध्या देशात जे पैशांचे संकट निर्माण झाले आहे ते लवकरच मिटणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

कोरोनाने आता स्वतःचे रूप बदलत अधिक घातक होण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरिएंट अतिशय घातक असून जगभरातील 135 देशांमध्ये फैलावला आहे. म्यानमारमध्ये सुद्धा या काळात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. या संकटातच देशात पैशांचा दुष्काळ निर्माण झाल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे.

Advertisement

डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 135 देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply