Take a fresh look at your lifestyle.

‘उज्ज्वला 2.0’ योजनेचे लाॅंचिंग, मोदी सरकारकडून गरीब कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन, कसा करणार अर्ज..?

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या (Modi sarkar) महत्त्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे (Ujjwala 2.0) लाॅंचिंग आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचे उद्घाटन झाले. 2021-22 या आर्थिक वर्षात देशभरातील 1 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

Advertisement

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील 1 हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा आदी उपस्थित होते. दरम्यान, या योजनेत सरकारकडून केवळ गॅस कनेक्शनच नव्हे, तर मोफत सिलिंडरदेखील देणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

उज्ज्वला 2.0 या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पत्त्याचा पुरावा देण्याचीही गरज नसल्याचे सरकारनं म्हटलं आहे. आपलं नाव आणि पत्ता एवढ्या तपशीलासह या गॅस योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठीचे निकष सरकारनं निश्चित केले आहेत.

Advertisement

योजनेसाठीचे निकष

Advertisement
 • अर्जदार ही महिला असणं बंधनकारक आहे
 • महिलेचं वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावं
 • महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी
 • महिलेकडे बीपीएल कार्ड किंवा रेशनकार्ड असणं बंधनकारक असेल
 • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील इतर कुणाच्याही नावे एलपीजी कनेक्शन नसावे.

गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज

Advertisement
 • या योजनेसाठी pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
 • वेबसाईटवर अर्ज डाऊनलोड करण्याचाही पर्याय दिसेल.
 • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यातील सर्व माहिती भरावी.
 • हा फॉर्म एलपीजी गॅस केंद्रात जमा करावा.
 • त्यासाठी आवश्यक कागदपत्रंही सोबत जमा करावीत.
 • त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून गॅस कनेक्शन मंजूर केलं जाणार आहे.

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त..!
बाब्बो.. भारतात सुरुये इंटरनेटचा दणका; पहा नेमके काय म्हटलेय केंद्र सरकारने

Advertisement
Advertisement

Leave a Reply