Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनने घेतलाय ‘तो’ मोठा निर्णय; पहा नेमकी काय आहे त्या देशातील परिस्थिती

 

Advertisement

दिल्ली : अवघ्या जगालाच कोरोनाच्या भयानक संकटात पकडणाऱ्या चीनमध्ये करोना पुन्हा त्रास देऊ लागला आहे चीनच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रांतात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर आता कोरोनचा सर्वात पहिला रुग्ण सापडलेल्या वुहान शहरात पुन्हा कोरोना परतला आहे. या शहरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा धोका पाहता प्रशासनाने तत्काळ कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच जास्तीत जास्त लोकांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या शहरातील तब्बल 1.12 कोटी लोकांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाने केली आहे.

Advertisement

या शहरात 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर हा घातक आजार जगभरात पसरला. शुक्रवारपर्यंत वुहान मध्ये एकूण 47 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या शहरात 4 ऑगस्टपासून कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविडच्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे.

Advertisement

डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 135 देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply