Take a fresh look at your lifestyle.

चरबी कमी करण्याचे टेन्शन आहे तर वाचा ‘ही’ महत्वाची माहिती; पहा किती आहे प्रभावी

आजच्या धावपळीच्या जमान्यात योग्य आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्टफूड आणि जंकफूडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज लठ्ठपणाच्या समस्येने आज अनेक लोक हैराण झाले आहेत. शहरी भागात तर हा त्रास अधिकच वाढत चालला आहे. यामुळे ताण तणावात सुद्धा वाढ झाली आहे. शरीरात वाढलेली चरबी केव्हाही घातकच ठरते. त्यामुळे चरबी कमी करुन स्वस्थ राहणे जास्त महत्वाचे आहे. यासाठी काही सोप्या टिप्स अमलात आणल्या तर या वाढत्या चरबीची समस्या निश्चित कमी होईल.

Advertisement

दिवसा शरीराती पाचनशक्ती चांगली असते, म्हणून यावेळी तुमच्या रोजच्या आहारातील 50 टक्के कॅलरीज घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर रिफाइन्ड कार्ब्सपासून दूर रहा. रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या कमी प्रमाणाने, पोटातील चरबी आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल.

Advertisement

आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, सकाळी उठून रिकाम्या पोटी मेथीचे दाणे भिजत ठेवलेले पाणी प्या. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्याने शरीरास मोठा फायदा होतो. पायी चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. या व्यायामाने शरीरास मोठा फायदा मिळतो आणि वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे. रोज 30 मिनिटे पायी वेगाने चालल्याने देखील पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. या व्यायामात योगा किंवा विविध प्रकारचे व्यायाम देखील समाविष्ट करता येतील.

Advertisement

आल्याच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक घटक असतात, जे शरीरातील चरबी जाळण्याचे काम करतात. आले पावडर गरम पाण्याने घेतल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, जर तुमचे वजन कमी होत असेल तर तहान लागल्यावर फक्त गरम पाणी प्या. गरम पाणी तुमचे चयापचय सक्रिय करून वजन कमी करण्यास मदत करेल .

Advertisement

आपण रोज जे अन्न घेतो. ते अन्न नीट चावून खाणे योग्य आहे. त्यामुळे भूक कमी करणारे हार्मोन्स सक्रीय होतात. आपल्यातले बरेच जण असे आहेत, की जे अन्न नीट चावून खाण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे असे अन्न शरीरात दोष उत्पन्न करू शकते. तसेच वजन वाढण्यासही कारणीभूत ठरू शकते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply