Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्यात येणार शेळीमार्फतची धवलक्रांती; पहा नेमके काय आहे राज्य सरकारचे नियोजन

पुणे / नाशिक : शेळी म्हणजे गरिबांची गाय असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते. ग्रामस्वराज्य प्रकल्पात शेळी या प्राण्याला खूप महत्व आहे. तसेच शेळीचे दुध खूप पोषक आहे. याच शेळीच्या दुधाद्वारे राज्यात पुन्हा एकदा धवलक्रांती आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारतर्फे सुरू आहेत. त्यामुळे शेळीपालन व्यवसायाला भविष्यात अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

Advertisement

सिन्नर येथील युवा मित्राच्या उत्कृष्ट शेळी, करडे स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी खूप महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी शेळीपालन व्यवसायात आमूलाग्र बदल घडवण्यात येणार आहे. जास्त दूध देणारी सानेन शेळी भारतात आणून त्यांची पैदास वाढवण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. याकरिता ऑक्टोबरमध्ये जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटलेय की, शेळीच्या दुधाला मुंबईसारख्या शहरात मोठी मागणी आहे. कोरोनासारख्या आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेळीचे दूध महत्त्वपूर्ण आहे. यासाठी शेळीपालन व्यवसायात भविष्यात मोठा बदल केला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेळीपालनातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रक्रिया, बाजारपेठ यावर भर असेल. जुन्या शेळ्यात संशोधन आणि विकास उपक्रम हाती घ्यावेत, साठ-सत्तर किलोपर्यंत शेळीचे वजन कसे जाईल हे पाहावे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply