Take a fresh look at your lifestyle.

गॅस कनेक्शनबाबतची ‘ही’ बातमी वाचलीय का..? पहा ना कसा होणार आहे सर्वांचा फायदा

मुंबई : एलपीजी गॅस कनेक्शनबाबत एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागरीकांचा फायदा होणार आहे. सध्या बेसिक कनेक्शनवर जी सबसिडी मिळत आहे, त्याच आधारावर घेतलेल्या इतर कनेक्शनसाठी सुद्धा सबसिडी मिळणार आहे. उज्वला योजनेअंतर्गत अशा प्रकारचे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकतात. यासाठी आपल्याला फक्त आपले आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे गॅस एजन्सीला द्यावी लागतील. आणि नवीन गॅस कनेक्शन साठी अर्ज करावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

Advertisement

सध्या देशभरात महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी गॅस दरात सुद्धा वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. अशा परिस्थितीत दिलासादायक निर्णय घेणे अपेक्षित असताना सरकारने मात्र या कडे दुर्लक्ष केले आहेत त्यामुळे नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. सरकारकडून दर कपात करण्याचा निर्णय घेतला जात नसला तरी दुसरे असे काही निर्णय घेतले जात आहेत की ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होत आहेत. आता गॅस कनेक्शन संदर्भात ही केंद्र सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Advertisement

या निर्णयानुसार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेतले जाऊ शकतात. सर्व गॅस कनेक्शन आधारशी जोडलेली असल्याने कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नाही. सरकार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन ची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि यामध्ये वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने सरकारचे नियोजन सुरू आहे. ऑनलाईन अर्ज किंवा एलपीजी गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील सरकारने आता सोपी केली आहे. या सुविधेअंतर्गत कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन घेतले असेल तरी कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकरणात फक्त पत्त्याची पडताळणी होईल.

Advertisement

ज्या कंपनीकडून गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात येतो, त्या कंपनीच्या गॅस एजन्सी कडे जाऊन मूळ गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. पडताळणीनंतर तात्काळ नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध होईल. आता मात्र तुम्हाला कोणत्याही कारणामुळे एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यास समस्या येत असेल तर यातील अडचणीही आता मिटणार आहेत. जर तुमच्या कुटुंबातील कोणाला एलपीजी गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शन सहज मिळेल यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नाही. तेल पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply