Take a fresh look at your lifestyle.

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त..!

पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) यांचं आजारपणामुळे आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. त्यांचे इंग्रजीसह सहा भाषांमध्ये भाषांतर झाले.

Advertisement

डाॅ. तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार विषयांतील तज्ज्ञ होते. लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’चे ते संस्थापक होते. आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवर त्यांनी विपूल संशोधन केले.

Advertisement

“डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. तांबे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

Advertisement

मोदी सरकार देणार ‘त्या’ 1 कोटी लोकांना मोफत स्कीम; पहा कसा घ्यायचा आहे याचा लाभ
बाब्बो.. पोलीस भरतीचा पेपर फुटला की; पहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply