Take a fresh look at your lifestyle.

वाचा की बातमी रिचार्ज करणारी; पहा कशामुळे टेन्शन कमी होणार आहे इलेक्ट्रिक गाड्यावाल्यांचे

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत आज इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमीच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने लोकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा विचार सुरू केला आहे. केंद्र सरकारने सुद्धा या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा नागरिकांनाही फायदा होणार आहे.

Advertisement

आगामी काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यासाठी सरकारने धोरण तयार केले आहे. त्यामुळे देशातील आघाडीच्या वाहन कंपन्या आता या क्षेत्रात उतरल्या आहेत. तसेच या वाहनांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर सरकारने भर दिला आहे. बंगळुरू येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप ‘Simple Energy’ ने सोमवारी आपल्या EV चार्जर लाँच करण्याची घोषणा केली. या चार्जरचे नाव ‘सिम्पल लूप’ असे ठेवले आहे. कंपनी आगामी काळात देशात विविध ठिकाणी 300 पेक्षा जास्त पब्लिक फास्ट चार्जर बसवणार आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज करण्यासाठी या चार्जचा वापर करता येईल. हे चार्जर सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असेल. तसेच या चार्जरच्या मदतीने अडीच किलोमीटरपर्यंत वाहन स्कुटर जाईल इतकी बॅटरी फक्त एक 60 सेकंदात चार्ज करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement

दरम्यान, वाढते प्रदूषण आणि वाढत जाणारे इंधनाचे भाव या मोठ्या संकटातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच तर आता इलेक्ट्रीक वाहनांचा स्वस्त आणि परवडणारा पर्याय समोर आला आहे. होय, यामागे कारणही तसेच आहे. एकतर सरकारने आता या वाहनांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले. त्यामुळे या वाहनांची विक्रीत वाढ होण्यासाठी काही निर्णय सुद्धा घेतले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे आजच्या घडीस जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कमी किमतीत दुचाकी खरेदी करता येईल. कारण, मोदी सरकारने असाच एक भन्नाट निर्णय घेतला आहे.

Advertisement

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात केली आहे. या वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. काही नियमातही बदल केले आहेत, त्यामुळे ही इलेक्ट्रिक वाहने आता अधिक स्वस्त होणार आहेत. सरकारने काही नियमात सुद्धा बदल केला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर जास्त अनुदान मिळेल. याआधी इलेक्ट्रिक दुचाकीसाठी प्रति KWH 10 हजार रुपये अनुदान मिळत होते. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर दुचाकी कंपन्यांनी किमती कमी करण्यास सुरुवात देखील केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply