Take a fresh look at your lifestyle.

सोने चार महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर.. चांदीच्या भावातही मोठी घसरण, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज (सोमवारी) सोन्याच्या दरात (Gold Rate) तब्बल 1.3 टक्क्यांची घसरण होऊन, मागील 4 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर ही दर पोहोचला होता.

Advertisement

सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण होऊन 46,029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करीत होता. चांदीच्या दरातही (Silver price) 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह, म्हणजेच सुमारे 1400 रुपयांनी चांदीचे दर कमी होऊन 63,983 रुपये प्रति किलोवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा दर 4.4 टक्क्यांनी घसरले.

Advertisement

प्रमुख शहरांतील सोन्याचा भाव (प्रति तोळा)

Advertisement

मुंबई : 46,280 रुपये
पुणे :  47,700 रुपये
नागपूर : 46,280 रुपये
नाशिक : 47,700 रुपये

Advertisement

मिस कॉलवर समजेल सोन्याचा भाव
आता तुम्हाला 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर एका मिस्ड काॅलवर समजणार आहेत. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर काही वेळातच सोन्याच्या दराचा एसएमएस येईल. शिवाय वारंवार अद्ययावत माहितीसाठी www.ibja.co या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.

Advertisement

दरम्यान, 2020 मध्ये गुंतवणूकदारांना सोन्याने गेल्या 12 वर्षांतील सर्वात वाईट परतावा दिला. सोन्याच्या किमतीत तब्बल 13 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

आता AUGMONT- EMI वर सोने खरेदी करता येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला 20 टक्के डाउनपेमेंट भरावे लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर EMI फिक्स्ड होतो. त्यासाठी ग्राहकांना कोणतीही अॅडिशनल कॉस्ट भरावी लागत नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

स्वस्तात सोनेखरेदीची संधी..! मोदी सरकारच्या या योजनेचा लगेच लाभ घ्या, कसा घ्यायचा जाणून घेण्यासाठी वाचा..!
हेरगिरी प्रकरणावर भाजपमध्ये आहे ‘ती’ भीती; पाहा काँग्रेसने नेमका काय मुद्दा मांडलाय जनतेसमोर

Advertisement
Advertisement

Leave a Reply