Take a fresh look at your lifestyle.

स्वस्तात सोनेखरेदीची संधी..! मोदी सरकारच्या या योजनेचा लगेच लाभ घ्या, कसा घ्यायचा जाणून घेण्यासाठी वाचा..!

तुम्ही स्वस्तात सोनेखरेदीसाठी इच्छुक असाल, तरी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ या वर्षात सार्वभौम सुवर्ण रोखे, अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ विक्रीचे १६ टप्पे जारी केले आहेत. त्याचा पाचवा टप्पा आजपासून (ता. ९) सुरु होत आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, चौथ्या मालिकेपेक्षा थोड्या कमी किमतीत हे सुवर्णरोखे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. हे रोखे स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका वगळता, इतर सर्व शेड्यूल कमर्शिअल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक टपाल कार्यालये; तसेच विविध ब्रोकिंग कंपन्या यांच्यामार्फत खरेदी करता येणार आहेत.

Advertisement

‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ची वैशिष्ट्ये

Advertisement
  • इश्‍यू सुरू होण्याची तारीख – ९ ऑगस्ट २०२१
  • इश्यू बंद होण्याची तारीख – १३ ऑगस्ट २०२१
  • किमान गुंतवणूक – एक ग्रॅम
  • कमाल गुंतवणूक – चार किलो
  • प्रतिग्रॅम किंमत – रु. ४७९०
  • डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत – रु. ४७४०
  • सुवर्ण रोख्यांचा कालावधी – ८ वर्षे
  • इश्‍यू किमतीवर वार्षिक व्याज – २.५० टक्के

‘गोल्ड बॉंड्‌स’ योजनेविषयी..
– एक ग्रॅम आणि त्या पटीत गोल्ड बाँड उपलब्ध आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत सरकार सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बाँडची विक्री करणार आहे. त्यातील शेवटचा टप्पा आजपासून सुरु होत आहे.

Advertisement

– गुंतवणूकदारांना टपाल कार्यालये, बॅंका, स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशनमधून गोल्ड बॉंड खरेदी करता येतील. त्याचबरोबर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातून गोल्ड बॉंडची विक्री केली जाणार आहे. कर्जासाठी तारण म्हणून गोल्ड बाॅंडला मान्यता आहे.

Advertisement

– वैयक्तिक गुंतवणूकदारांना १ ग्रॅमपासून त्यापटीत जास्तीत जास्त ४ किलो, एचयूएफ ४ किलोग्रॅम आणि ट्रस्ट आणि इतर संस्थांना २० किलोपर्यंत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल.

Advertisement

– त्यावर दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाणार आहे. वार्षिक आणि अर्ध वार्षिक स्तरावर व्याज दिले जाईत. या बॉंडची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Advertisement

तब्बल ३२.३५ टन सोने विक्री
सार्वभौम सुवर्णरोखे योजना सुरु झाल्यापासून जुलैपर्यंत या योजनेत केंद्र सरकारने २५,७०२ कोटी रुपये उभारले आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु केली होती. रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ या वर्षात गोल्ड बॉन्ड योजनेचे विक्री १६ टप्पे जारी केले. ज्यातून तब्बल ३२.३५ टन सोने विक्री झाले आहे. ज्यात सरकारला १६०४९ कोटींचा महसूल मिळाला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply