Take a fresh look at your lifestyle.

EPFO ची भरती परीक्षा आहे 5 सप्टेंबरला; प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड

पुणे : कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील (EPFO) भरतीसाठीची लेखी परीक्षा 05 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. ही परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) मार्फत ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. याद्वारे, ईपीएफओमध्ये अंमलबजावणी अधिकारी आणि लेखा अधिकारी (ईपीएफओ लेखा अधिकारी) च्या एकूण 421 पदांची भरती केली जाणार आहे.

Advertisement

यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत. यापूर्वी ही परीक्षा 04 ऑक्टोबर 2020 रोजी होणार होती. परंतु यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स एकाच तारखेला असल्याने आणि कोरोनाच्या संकटामुळे ईपीएफओ परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता उमेदवार प्रवेशपत्राची (Admit Card) वाट पाहत आहेत. यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या सुमारे 15 दिवस आधी प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. म्हणजेच, EPFO प्रवेशपत्र 2021 ची लिंक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सक्रिय होईल.

Advertisement

प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्यासाठी :  UPSC वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in ला भेट द्या. UPSC EPFO प्रवेशपत्र 2021 साठी लिंकवर क्लिक करा. नवीन पान उघडेल. येथे आपण दोन प्रकारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. पहिला- रोल नंबर द्वारे आणि दुसरा- तुमच्या नोंदणी आयडी किंवा अर्ज क्रमांकाद्वारे. ही माहिती भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर तुमचे UPSC EPFO प्रवेशपत्र 2021 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा. एक प्रिंट घ्या आणि सुरक्षित ठेवा.

Advertisement

अभ्यासक्रम : यूपीएससी ईपीएफओ परीक्षा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये घेतली जाईल. सामान्य इंग्रजी, भारतीय स्वातंत्र्य लढा, चालू घडामोडी, भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्र, सामान्य लेखा तत्त्वे, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदा, सामान्य विज्ञान, संगणक अनुप्रयोग, सामान्य मानसिक क्षमता, परिमाणात्मक योग्यता आणि भारतातील सामाजिक सुरक्षा या विषयांमधून प्रश्न विचारले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply