Take a fresh look at your lifestyle.

राम शिंदे यांनीही घेतली ‘त्यांची’ भेट; पहा दिल्लीत नेमके काय चाललेय त्यांचे राजकारण

अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी पालकमंत्री राम शिंदे हे सध्या विशेष सक्रीय नाहीत. कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्या शिंदे यांनी पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी थेट दिल्लीवर स्वारी केली आहे.

Advertisement

आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत डेरेदाखल झालेले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गटाचे महत्वाचे नेते म्हणून शिंदे यांची ओळख आहे. मात्र, आता सकाळी फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची एकट्याने भेट घेतली होती. तर, चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांच्यासह इतरांना घेऊन भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर शिंदे हे विशेष सक्रीय नाहीत. त्यामुळेच आज ते ठेई दिल्लीत गेल्याने आता महाराष्ट्र भाजप त्यांना कोणती जबाबदारी देणार की काय याची चर्चा सुरू झालेली आहे. रोहित पवार यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात आता शिंदे यांचे कार्यकर्ते गळाला लावण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत असतानाच शिंदे हे थेट दिल्लीत गेल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply