Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून नगर होऊ शकणार नाही खड्डेमुक्त; पहा नेमका काय आहे त्याचा फंडा

अहमदनगर : शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता खेड्यात आल्यासारख वाटते खरेतर खेड्यामध्ये देखील रस्त्यांची आता सुधारणा होत आहे, परंतु अहमदनगर शहरातील रस्ते म्हणजे खड्ड्याचा संग्रह बनला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत आणि अनेकांना अपघातात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच नगर शहरातील खड्डे चेष्टेचा विषय देखील बनला आहे. या गोष्टींसाठी मनपा प्रशासन नक्कीच दोषी आहे परंतु पडद्या आड असलेली बाजू देखिल उघड करणे गरजेचे आहे असे सांगत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Advertisement

नगर शहरातील कामे घेत असलेल्या ठेकेदारांना कामे पूर्णत्वास जाण्यासाठी व कामामध्ये कोणतीही अडचण न येण्यासाठी ठेकेदारांना जितके लाखांचे किव्हा कोटींचे काम आहे त्यातील १०% टक्के रक्कम भ्रष्टाचारी नगरसेवकांना टक्केवारी घ्यावे लागते व हल्ली टक्केवारी घेणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मोजकेच नगरसेवक आपले काम प्रामाणिकपणे करतात म्हणून त्यांचे निधीतील रस्ते उत्तम दर्जाचे होऊन दीर्घकाळ  टिकतात, आता नगर शहराला खड्डेमुक्त करणे नगरच्या जनतेच्या हातात आहे. जे नगरसेवक ठेकेदारांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतात त्यांना जनतेने धडा शिकवत निवडणुकीमध्ये घरी बसावे प्रामाणिक नगरसेवकांना निवडून द्यावे तेव्हाच नगर शहर खड्डेमुक्त होऊ शकते असा खोचक सल्ला मयुर पाटोळे यांनी दिला आहे, होत असलेल्या भ्रष्टाचाराला ठेकेदार सुद्धा तितकेच जबाबदार आहे त्यामूळे मयूर पाटोळे यांनी ठेकेदारांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.

Advertisement

नगर शहरामध्ये होत असलेल्या विकास कामाची महानगरपालिकेने योग्य वेळेतच पाहणी करून कामे योग्य पद्धतीने करून घेण्याचे सल्ला देण्यात आला व काम होत आहे तेथे ठेकेदार मुदत संपलेल्या सिमेंट कमी दरात मिळतो ते वापरतात अशा ठेकेदारांवर कारवाई देखील करण्यात यावी नगर शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याची भावना युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement

Leave a Reply