Take a fresh look at your lifestyle.

मुकेश अंबानींना झटका..! सर्वोच्च न्यायालयाचा अमेझाॅनच्या बाजूने निकाल, पाहा नेमकं काय प्रकरण आहे..?

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठा झटका दिला आहे. फ्यूचर-रिलायन्स रिटेल डील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने निकाल देताना रिलायन्स-फ्युचरमधील 24 हजार कोटींच्या कराराला स्थगिती दिली आहे.

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फ्यूचर समूहाचा किरकोळ व घाऊक व्यवसाय, रसद व गोदाम व्यवसाय २४,७१३ कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली होती.

Advertisement

या करारामुळे रिलायन्सला फ्युचर ग्रुपच्या ४२० शहरांमध्ये पसरलेल्या १८०० पेक्षा जास्त स्टोअरमध्ये प्रवेश मिळाला असता. मात्र, त्याला फ्युचर समूहातील गुंतवणूकदार असलेल्या अॅमेझाॅनने सिंगापूरमधील लवादात आव्हान दिले होते. 25 ऑक्टोबर 2020 रोजी सिंगापूरच्या न्यायालयानेही या कराराला स्थगिती दिली होती.

Advertisement

दरम्यान, स्थगिती दिल्यानंतर 90 दिवसांत त्यावर निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले होते.  मात्र, सिंगापूर कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास रिलायन्स आणि फ्युचर बांधील नव्हते. त्यामुळे सिंगापूर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयात आज त्यावर सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की Emergency Arbitrator निर्णय लागू करण्यायोग्य आहे. Emergency Arbitrator ने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.

Advertisement

दरम्यान, ही बातमी समोर येताच, रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सकाळी 11 वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.79 टक्के (38.30 रुपये) घसरून 2095.95 रुपयांच्या पातळीवर आला.

Advertisement

शेअर बाजारात सेन्सेक्स 157 अंकांच्या घसरणीसह 54335 च्या पातळीवर, तर निफ्टी 22 अंकांनी 16272 च्या पातळीवर घसरला होता. सेन्सेक्समध्ये सध्या रिलायन्सला मोठा तोटा सहन करावा लागतोय.

Advertisement

मोदींनी मारला मास्टरस्ट्रोक; काँग्रेसला झटका, पहा क्रीडाक्षेत्रात काय केलेय सरकारने
बाब्बो.. पवारांची झाली ‘त्यांच्या’शीही भेट; पहा नेमके काय चाललेय हे राजकारणात

Advertisement
Advertisement

Leave a Reply