Take a fresh look at your lifestyle.

मोदींनी मारला मास्टरस्ट्रोक; काँग्रेसला झटका, पहा क्रीडाक्षेत्रात काय केलेय सरकारने

दिल्ली : मागील सत्तर वर्षात काहीही झालेले नसल्याचे आलाप करतानाच काँग्रेसच्या चुकांवर नेमके बोट ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी राजकारण केलेले आहे. सगळीकडे गांधी घराण्याचे नाव देण्याची चूक ही भारतीयांची दुखती नस आहे. आताही तिलाच पकडून मोदी सरकारने क्रीडाक्षेत्रात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने कॉंग्रेसला झटका बसला आहे. मात्र, त्यावर बोलण्याची सोय उरलेली नाही.

Advertisement

Advertisement

भारत सरकारच्या वतीने क्रीडा विभागातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी देण्यात येणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. ऑलम्पिक मध्ये हॉकीच्या दमदार कामगिरीची चर्चा होत असतानाच मोदी सरकारने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरवरून घोषणा केली आहे.

Advertisement

“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू  विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, गोपीचंद, अभिनव बिंद्रा, अंजूबॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply