Take a fresh look at your lifestyle.

वोडफोन-आयडियाचे शेअर्स कोसळले, गुंतवणुकदारांना चार दिवसांत १० हजार कोटींचा चुना..

मुंबई : वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) टेलिकॉम कंपनी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये  (Share Market) सातत्याने घसरण होत आहे. मागच्या फक्त चार दिवसांत कंपनीचे शेअर्स तब्बल 45 टक्क्यांनी घसरले. 2 ऑगस्टला कंपनीचा शेअर 8.25 रुपयांवर होता. तो गुरूवारी 24.45 टक्क्यांनी घसरून 4.55 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर गेला. या सगळ्यात गुंतवणुकदारांचे 10 हजार 296 कोटी रुपयांचे नुकसान झालं.

Advertisement

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठा 31 ऑगस्ट 2018 रोजी वोडाफोन व आयडिया या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं. मात्र, त्यानंतरही ही कंपनी सातत्याने तोट्यात आहे. निधी जमविण्याचे कंपनीचे प्रयत्न असफल झाल्याने बिर्ला यांनी कर्जात बुडालेल्या कंपनीला बाहेर काढण्यासाठी सरकारी पॅकेज देण्याची मागणी केली होती.

Advertisement

कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने ‘वोडाफोन-आयडिया’ टेलिकॉम कंपनी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात कुमार मंगलम बिर्ला यांनी कंपनीच्या ‘नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ आणि डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला. बिर्ला यांच्या राजीनाम्यानंतर गुरूवारी (5 ऑगस्ट) वोडाफोन-आयडियाचा शेअर 24.54 टक्क्यांनी कोसळून 52 आठवड्यातील निच्चांकी 4.55 रुपयांवर गेला. कंपनीचे शेअर्स सातत्यानं कोसळत असल्यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा फटका बसला आहे.

Advertisement

वोडाफोन-आयडिया कंपनीवर 58,254 कोटी रुपयांचे कर्ज होते. पैकी 7,854.37 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने फेडले. मात्र, अजूनही कंपनीच्या डोक्यावर 50,399.63 कोटींचे कर्ज आहे. केंद्र सरकारने परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनीला 15000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी दिली. मात्र, सरकारी धोरणामुळे कोणीही या कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार नसल्याचे कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement

कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पाठविलेल्या पत्रात वोडाफोन-आयडिया कंपनीतील आपला हिस्सा सरकार किंवा अन्य कंपनीला विकण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार, पाहा कधीपासून सुरु होणार..?
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही उतरली..! गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी, पाहा सराफ बाजारातील स्थिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply