Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पवारांची झाली ‘त्यांच्या’शीही भेट; पहा नेमके काय चाललेय हे राजकारणात

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातील महत्वाचे नेते असलेल्या खासदार शरद पवार यांच्या सध्या नियमितपणे भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात नेमके काय चालू आहे, याबाबत चर्चा होत आहेत. आताही भाजपचे नेते आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्माई यांनी पवारांची भेट घेतली आहे.

Advertisement

Advertisement

याबाबत शरद पवार यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या बंगलोर दौऱ्यावर असताना मला कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बोम्मई यांचा फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पदाचा आदर मनात ठेवून, मी त्यांना सौजन्याने भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी आभारी आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये दोन्ही राज्ये सहकारी दृष्टीने एकत्र काम करत राहतील अशी आशा आहे.

Advertisement

एकूणच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि धरणातील पाण्याच्या मुद्द्यावर या दोन्ही राज्यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर इतका मोठा कालावधी लोटला तरीही या दोन्ही राज्यांमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आता शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply