Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंकेच्या बातमीला मिळाला यु टर्न; पहा आताच्या नव्या पत्रात काय म्हटलेय सरकारी कर्मचाऱ्यांनी

अहमदनगर : पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी मारहाण केल्याचे पत्र आल्यानंतर एकच गहजब उडाला होता. मात्र, आता त्यावरील चर्चेचा धुराळा शांत झाला आहे. कारण, संबंधित कर्मचाऱ्यांनीच असे काहीही घडले नसल्याचे पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

पारनेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पत्र पाठवून टोकण विकण्याचे आरोप करून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमदार नीलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली असेच म्हटलेले आहे. त्यावर आता राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवीगाळ किंवा मारहाण झालेली नसल्याचे म्हटलेले आहे. एकूणच मग यानिमित्ताने याप्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. कारण, आमदारांबाबत असे पत्र मग वैद्यकिय अधीक्षक यांनी काढले कसे, याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

पाटील यांनी पारनेर पोलिसांना याबाबत पत्र दिलेले आहे. तसेच प्रसिद्धी पत्रकात त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की, आमदारांनी कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळ केलेली नाही. सोशल मीडियामध्ये शेअर होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आणि बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे पोलिसांना याबाबत रीतसर तक्रार दिलेली आहे. तसेच पत्राच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याचीही कबुली पाटील यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement

Leave a Reply