Take a fresh look at your lifestyle.

भारीच की.. पाकिस्तानी कोर्टानेही घेतली मंदिर विटंबना मुद्द्याची दखल; पहा इम्रान खान यांनी काय म्हटलेय

दिल्ली : पाकिस्तानात सगळेच काही वाईट चालू असून तिथली राजकीय व धार्मिक यंत्रणा जशी किडलेली आहे तशीच सामाजिक व न्यायालयीन यंत्रणा असल्याच्या चर्चा भारतात सुरू असतात. मात्र, तेथील न्यायिक यंत्रणेने एका धार्मिक महत्वाच्या मुद्द्याची तातडीने दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्याने अनेकांना सुखद धक्का बसला आहे.

Advertisement

Advertisement

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदू मंदिरावरील हल्ल्यातील आरोपींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत. रहिम यार खान येथील मंदिरावर हल्ला करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने मंदिराच्या दुरुस्तीचे आदेशही दिले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ काही माथेफिरू कट्टर धर्मांध मंडळींनी सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला होता.

Advertisement

भारतातही अशा घटना घडत असतात. मात्र, आपल्याकडे तातडीने दखल घेतली जाण्याचे प्रमाणही नगण्य आहे. तसेच पाकिस्तानमध्येही चित्र आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षक (IGP) यांना या प्रकरणी 24 तासांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले होते. पंजाबमधील भोंग शहरातील गणेश मंदिरात धर्मांध माथेफिरूंनी गोंधळ घातला होता. त्यात मूर्ती तुटल्या होत्या. मंदिरातील झुंबर, काचेसारख्या सजावटीच्या वस्तू तुटल्या होत्या. हे भ्याड कृत्य करत असताना कट्टरपंथीयांचा मोठा जमाव कॅमेऱ्यात दिसत होता.

Advertisement

Advertisement

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्विट करून गणेश मंदिरावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. इम्रान खान यांनीही आश्वासन दिले होते की त्यांचे सरकारही या मंदिराचा जीर्णोद्धार करेल. हिंदू मंदिरावरील हा हल्ला 9 वर्षांच्या हिंदू मुलाला दिलेल्या जामिनाच्या निषेधार्थ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मुलावर स्थानिक मदरशात लघवी केल्याचा आरोप होता. त्यानंतर शेकडो कट्टरवाद्यांनी भोंगमधील हिंदू मंदिराची तोडफोड केली आणि सुकूर-मुल्तान महामार्ग (एम -5) रोखला होता.

Advertisement

Advertisement

Leave a Reply