Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. तर अरबी समुद्रात फुटणार युद्धाला तोंड; पहा कोणत्या मुद्द्यावर भडकलेय राजकारण

मुंबई : इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गुरुवारी इशारा दिला आहे की, त्यांचा देश इराणवर हल्ला करण्यास तयार आहे. ही धमकी समुद्रातील एका तेलाच्या टँकरवर घातक ड्रोन हल्ल्यानंतर आली आहे. याप्रकरणी इस्रायलने तेहरानला दोष दिला आहे. गेल्या आठवड्यात तेल टँकर मर्सर स्ट्रीटवर झालेल्या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात इस्रायलने संयुक्त राष्ट्रात इराणविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

ओमानच्या अरबी समुद्रात ज्या टँकरवर हल्ला झाला ते इस्रायली अब्जाधीशांच्या मालकीच्या फर्मचा होता. अमेरिका आणि ब्रिटननेही या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. असे ड्रोन हल्ले करणाऱ्या इराणने तेल टँकरवरील हल्ल्यात सहभाग नाकारला आहे. मात्र, याप्रकरणी इस्त्राईल आक्रमक झाला आहे. तसेच जागतिक राजकारण तापलेले आहे. त्यामुळे अरबी समुद्रात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

न्यूज वेबसाईट Ynet शी बोलताना गॅन्ट्झने एका प्रश्नाला ‘होय’ असे उत्तर दिले आहे. ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, इस्रायल इराणवर हल्ला करण्यास तयार आहे का? ते म्हणाले की, आम्ही अशा परिस्थितीत आहोत जिथे आपल्याला इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची गरज आहे. जगाला आता इराणविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी गॅन्ट्झच्या धमकीला “आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणखी एक क्रूर उल्लंघन” आणि “दुर्भावनापूर्ण व्यवहार” असे वर्णन केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, इराणविरोधातील कोणत्याही मूर्ख कृत्याला निर्णायक प्रतिसाद दिला जाईल. इस्राईलच्या धमकीला उत्तर देताना खतीबजादेह म्हणाले, ‘आमची परीक्षा घेऊ नका’. त्यामुळेच या दोन्ही आक्रमक देशात युद्धाची ठिणगी पडण्याचा धोका वाढला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply