Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंकेप्रकरणी दबाव आणणारे नेमके कोण..? उलटसुलट चर्चेला उधाण, पहा पत्रात काय म्हटलेय ते

अहमदनगर : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आरोग्य विभागाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे पत्र पुढे आल्यानंतर एकच गहजब उडाला होता. मात्र, अखेरीस ज्यांना मारहाण झाली त्या कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांनी शिवीगाळ व मारहाण झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगून टाकले आहे. दरम्यान, त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांच्यावर काहींनी दबाव टाकल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

Advertisement

आमदार लंके यांनी पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच मारहाण केल्याचे पत्र पारनेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पत्र पाठवून दिलेले आहे. मात्र, आता संबंधित कर्मचाऱ्यांनीच असे काहीही घडले नसल्याचे पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण,आमदारांबाबत असे पत्र मग वैद्यकिय अधीक्षक यांनी काढले कसे, याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

Advertisement

टोकण विकण्याचे आरोप करून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमदार नीलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली असेच अगोदरच्या पत्रात म्हटलेले आहे. त्यानंतर पारनेर पोलिसांना दिलेल्या पत्रात व प्रसिद्धी पत्रकात पाटील स्पष्ट म्हटलेले आहे की, आमदारांनी कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळ केलेली नाही. सोशल मीडियामध्ये शेअर होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आणि बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे पोलिसांना याबाबत रीतसर तक्रार दिलेली आहे. तसेच पत्राच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याचीही कबुली पाटील यांनी दिली आहे.

Advertisement

तसेच पुढे त्यांनी म्हटलेय की, ५ ऑगस्टला तालुक्यातील काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालयात आलेले होते. त्यांनी काही पत्रकार मंडळींना माझा फोन नंबर देऊन आमदारांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे बोल असे सांगितले. दबावापोटी त्यांनी सांगितले तसे स्टेटमेंट दिले. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. यानिमित्ताने असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मग दबाव आणणारे नेमके कोण होते आणि केंद्रावर उडालेल्या गोंधळास जबाबदार कोण? यावर कोणती प्रशासकीय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply