Take a fresh look at your lifestyle.

पारनेरप्रकरणी ‘त्या’ १५ मुद्द्यांकडे राज्याचे लक्ष; आमदार लंकेविरोधात ‘त्यांचे’ राजकीय षड्यंत्र..?

अहमदनगर : पारनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्राच्या करोना लसीकरण गोंधळामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. याप्रकरणी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर आरोग्य विभागाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे आरोप करणारे पत्र प्रशासनाने काढलेले होते. तर ज्यांना मारहाण झाली असे म्हटले जाते त्या कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांनी शिवीगाळ व मारहाण झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगून टाकले आहे. त्यामुळे यातील राजकीय व प्रशासकीय गोंधळ वाढला आहे.

Advertisement

Advertisement

टोकण विकण्याचे आरोप करून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमदार नीलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली असेच अगोदरच्या पत्रात म्हटलेले आहे. त्यानंतर पारनेर पोलिसांना दिलेल्या पत्रात व प्रसिद्धी पत्रकात पाटील स्पष्ट म्हटलेले आहे की, आमदारांनी कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळ केलेली नाही. सोशल मीडियामध्ये शेअर होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आणि बदनामी करणाऱ्या आहेत. त्यामुळे पोलिसांना याबाबत रीतसर तक्रार दिलेली आहे. तसेच पत्राच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याचीही कबुली पाटील यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement

तसेच पुढे त्यांनी म्हटलेय की, ५ ऑगस्टला तालुक्यातील काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालयात आलेले होते. त्यांनी काही पत्रकार मंडळींना माझा फोन नंबर देऊन आमदारांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे बोल असे सांगितले. दबावापोटी त्यांनी सांगितले तसे स्टेटमेंट दिले. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. यानिमित्ताने असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मग दबाव आणणारे नेमके कोण होते आणि केंद्रावर उडालेल्या गोंधळास जबाबदार कोण? यावर कोणती प्रशासकीय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आमदार लंकेच्या विरोधात राजकीय षड्यंत्र नेमके कोण करीत आहेत, असाही मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Advertisement
पत्रांतून निर्माण होणारे राजकीय मुद्दे असे :
१.        आमदार निलेश लंके यांची लोकप्रियता नेमकी कोणाला खटकत आहे?
२.        लंके यांच्या ‌विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले जात आहे. या षडयंत्राला नेमके कोण खतपाणी घालीत आहे?
३.        पारनेरमध्ये प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा राजकीयदृष्ट्या वापर नेमका कोण करीत आहे?
४.        या घटनेमुळ आता पारनेरच्या राजकारणात नेमके काय परिणाम होणार?
५.        पारनेरमध्ये सर्वच सरकारी विभागात अधिकारी व कर्मचारी राजकीयदृष्ट्या विभागले गेले आहेत का?

 

Advertisement
पत्रांतून निर्माण होणारे प्रशासकीय दृष्टीने मुद्दे असे :
१.        पारनेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पाठवलेले पत्र खरे की खोटे?
२.        हे पत्र खरे असल्यास त्यासाठीचे कागदोपत्री पुरावे कोणते होते?
३.        हे पत्र खोटे असल्यास, मग असे पत्र देऊन जबाबदार लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई होणार का?
४.        पारनेर ग्रामीण रुग्णालयात दि. ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेपर्यंत नेमके कोणते असे महत्वाचे कामकाज चालू होते?
५.        लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला असे पत्रात म्हटलेले आहे. मग या गोंधळामुळे नागरिकांना झालेल्या मनस्तापाची जबाबदारी कोणाची?
६.        लसीकरण केंद्रावर टोकण वाटपातील गोंधळ नेमक्या कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सूचनेनुसार होत आहे?
७.        अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात गोंधळ निर्माण करून नेमके कोणते ‘अर्थपूर्ण’ संबंध सुधारले जात आहेत?
८.        उलटसुलट पत्र काढून आरोग्याचा बोजवारा उडालेला असतानाही त्यावर पांघरून घालण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?
९.        पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण सापडत असताना आरोग्य विभाग लसीकरण गोंधळ आणि आणखी कशात अडकून पडला आहे?
१०.     या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन आरोग्य विभागाच्या ‘जबाबदार’ अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई होणार की नाही?

 

Advertisement

आमदार लंके यांनी पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच मारहाण केल्याचे पत्र पारनेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पत्र पाठवून दिलेले आहे. मात्र, आता संबंधित कर्मचाऱ्यांनीच असे काहीही घडले नसल्याचे पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण,आमदारांबाबत असे पत्र मग वैद्यकिय अधीक्षक यांनी काढले कसे, याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply