Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानवर आलीय ‘ती’ दुर्दैवी वेळ; भारतासोबतच्या एका निर्णयाचा फटका 40 टक्के मुलांना..!

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तान सध्या स्वतःच्याच जाळ्यात पुरता अडकला आहे. दहशतवादास खतपाणी घालून अन्य देशांना त्रास देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे मोठेच नुकसान झाले आहे. गरीबी, बेरोजगारी, अन्न धान्याचे संकट, पिण्याच्या पाण्याचे संकट अशा एक ना अनेक संकटाचा सामना पाकिस्तान सध्या करत आहे. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था सुद्धा पुरती डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेस सावरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र, या प्रयत्नात पाकिस्तान पुरता कंगाल झाला आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की सरकारी मालकीच्या जागा, इमारती भाडोत्री देऊन उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

होय, आताही पाकिस्तान सरकारने असाच एक निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे सरकारी निवासस्थान भाडोत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाने सरकारी निवासस्थानाचे विद्यापीठात रुपांतर करण्याची घोषणा केली होती. मात्र, या नियोजनात बदल करत आता हा परिसर भाडोत्री देण्याचा नवा निर्णय घेण्यात आल्याची माहिती येथील स्थानिक मिडीयाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हे सरकारी निवासस्थान आता सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, फॅशन शो आणि अन्य कार्यक्रमांसाठी भाडोत्री देण्यात येणार आहे. उत्पन्न मिळवण्याचा हा नवा मार्ग पंतप्रधान इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानने शोधून काढला आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आज अन्न धान्याचे संकट निर्माण झाले आहे. भारताबरोबर व्यापार बंद असल्याने देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, देशाच्या राज्यकर्त्यांना त्याची काळजी नाही. तर दुसरीकडे देशात आज 40 टक्के मुले कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत, हे सुद्धा त्यांनी मान्य केले आहे. डॉनने काही दिवसांपूर्वी वृत्त दिले होते, की पाकिस्तानने मागील वर्षात 40 दशलक्ष टन गहू आयात केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात गहू आयात केल्याने त्याचा परिणाम देशाच्या परकीय चलसाठ्यावर झाला. आज देशासमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. सकस आहाराअभावी देशातील 40 टक्के मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत नाही, असे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply