Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात खरेदीचा ओघ कायम, सेन्सेक्स विक्रमी स्तरावर, भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम आहे. आशियातील प्रमुख भांडवली बाजारात आज तेजीचे वातावरण होते. आजच्या सत्रात सावर्जनिक बँका, स्थावर मालमत्ता आणि धातू क्षेत्रातील शेअरवर दबाव दिसून आला.

Advertisement

केंद्र सरकार काही तरी आर्थिक पॅकेज देईल, या उद्देशाने दूरसंचार कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. रिझर्व्ह बँकेचे (RBI) पतधोरण उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे. भांडवली बाजारात तेजी वाढविण्यास या घडामोडी पोषक ठरल्याचे दिसून आले.

Advertisement

शेअर बाजारात (Share Market) आज सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) वाढ झाली. नफावसुलीने आज सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने नकारात्मक सुरूवात झाली होती, मात्र त्यातून सावरत दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली. सेन्सेक्समध्ये २६० अंकाची वाढ होऊन ५४,६५७ अंकांचा नवा विक्रमी स्तर गाठला. निफ्टीतही ६० अंकाच्या वाढीसह १६३१० अंकावर पोचला होता.

Advertisement

जुलैमध्ये वार्षिक आधारावर ‘जीएसटी’ उत्पन्न ३३.१४ टक्क्यांनी वाढून १.१६ लाख कोटी रुपयांवर गेले. त्याचबरोबर औद्योगिक ‘पीएमआय’ जुलैमध्ये ५५.३वर गेला आहे. बेरोजगारीचा दरही जुलैमध्ये ६.९५ टक्क्यांवर आला आहे. जूनमध्ये तो ९.१७ टक्के होता.

Advertisement

बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी, येस बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये आज बाजारात घसरण झाली. रियल्टीमधील इंडिया बुल्स रियाल इस्टेट, शोभा, प्रेस्टिज इस्टेट, नेस्को यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.

Advertisement

मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ बुधवारी (ता.४ ऑगस्ट) ५४६.४१ अंकांनी उसळून ५४,३६९.७७ या अत्युच्च पातळीवर स्थिरावला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १२८.०५ अंकांनी वाढून १६,२९०.२० या ऐतिहासिक उच्चांकावर गेला होता. या तेजीने गुंतवणूकरांची मालमत्ता जवळपास तीन लाख कोटींनी वाढवली होती.

Advertisement

बिर्लांनी ‘त्या’ पत्रात म्हटलेय ‘असेही’; पहा मोदी सरकारला नेमके काय केलेय खोचक आवाहन..!
वोडाफोन-आयडियाचा पाय आणखी खोलात, कुमार मंगलम् बिर्ला यांनी घेतला टोकाचा निर्णय, ग्राहकांचे काय होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply