Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन शाॅपिंग करताना ही काळजी घ्या, नाहीतर बसू शकतो खिशाला फटका..

मुंबई : कोरोनामुळे अनेकांना शाॅपिंगच्या आवडीला मुरड घालावी लागली. ई-काॅमर्स कंपन्यांनीही या काळात काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. फक्त आवश्यक वस्तूंचीच घरपोच डिलिव्हरी केली जात होती. आता कोरोनातून काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजार सुरु झाले असून, ई-काॅमर्स कंपन्यांनी बंपर सेल सुरु केले आहेत.

Advertisement

लोकांच्या मनात कोरोनाची अजूनही कोरोनाची भीती असल्याने मॉल, वा बाजारपेठेत जाऊन खरेदी केली जात नाही. अनेक जण ऑनलाइन शॉपिंगलाच प्राधान्य देतात. दिवसभर ऑनलाईन वेबसाईटवर सर्फिंग करून आवडलेल्या वस्तू कार्टमध्ये सेव्ह करून ठेवतात. नंतर सेलनुसार त्या खरेदी करतात.

Advertisement

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते.

Advertisement

सध्या ऑनलाईन शाॅपिंगसाठी अनेक अ‍ॅपचे पर्याय उपलब्ध आहेत. अ‍ॅपवर शॉपिंग करताना सेल किंवा काही ऑफर असताना, शॉपिंग केल्यास तुमचा फायदा हाेऊ शकतो. दिवाळी, दसरा, स्वातंत्र्यदिनानिमित्त नेहमी बंपर सेल जाहीर होत असतात. मात्र, अशा वेळी खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

ऑनलाईन शाॅपिंग करताना काय काळजी घ्याल..?

Advertisement
  • कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती वस्तू कोणत्या ब्रँडची आहे, त्यांची किंमत, त्या वस्तूचा रंग या सर्व बाबी नीट तपासून घ्या.
  • पेमेंट करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असे अनेक पर्याय दिलेले असतात. तसेच ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चाही पर्याय असतो. शक्य असेल तेव्हा शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हाच पर्याय वापरावा. कारण तो सर्वाधिक सुरक्षित पर्याय आहे.
  • कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूला रिटर्न हा पर्याय आहे का? हे नक्की पाहा, कारण काही वस्तूंना रिटर्न पर्याय नसतो. त्यामुळे एखादी वस्तू तुम्हाला आवडली नाही, तर तुम्ही ती परत करू शकता.
  • ऑनलाइन शॉपिंग करताना फसवेगिरी देखील फार होऊ शकते, त्यामुळे काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. तरच आपण ऑनलाइन शॉपिंगचा घरबसल्या आनंद घेऊ शकतो.
  • http पासून सुरू होणाऱ्या लिंक्स आणि वेबसाईटच्या माध्यमांतून शक्यतो खरेदी करावी. कारण अशा वेबसाईट सेक्युअर असतात. नाहीतर तुमचा पत्ता, क्रेडिट कार्ड आणि बँकची माहिती हॅक होऊ शकते.
  • इंटरनेट फिशिंगमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे वेबसाईटची सेक्युरिटी योग्य असल्याची माहिती खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण करू नये.
  • वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसी वाचून मगच खरेदी करा. एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूंच्या किंमती इतर एक दोन वेबसाईटवर तपासून पाहानाहीतर कधी- कधी तुम्हाला किंमतीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतील.
  • इतर वेबसाईटवर काही छुपे चार्जेस देखील असतात. त्यांची देखील खात्री करून घ्यावी. पेमेंट क्रेडिट कार्डने असल्यास इतर पर्यायांपेक्षा जरा सुरक्षित असते कारण तुमचा काही तोटा झाल्यास, तोटा नक्कीच कमी होतो.
Advertisement

Leave a Reply