Take a fresh look at your lifestyle.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता ‘आरटीओ’त हेलपाटे मारण्याची गरज नाही, पाहा कोणाला दिलाय हा अधिकार..?

मुंबई : वाहन वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढण्यासाठी क्षेत्रीय परिवहन कार्यालयात (RTO) हेलपाटे मारण्याची गरज राहिलेली नाही. केंद्र सरकारने नुकताच एक नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार आता वाहन उत्पादक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्था परस्पर वाहनचालकांना परवाने देऊ शकणार आहेत.

Advertisement

दरम्यान, वाहन परवाना देण्यासाठी वाहन प्रशिक्षण केंद्रासाठीचा परवाना असणे आवश्यक आहे. या संस्था आपल्या चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना वाहनपरवाना देऊ शकतील. वाहन परवाना जारी करणाऱ्या संबंधित संस्थांकडे सर्व पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवस्था असल्या पाहिजेत. केंद्रीय मोटरनियमन कायदा, 1989 मध्ये नमूद केलेले सर्व निकष या संस्थांनी पूर्ण केले पाहिजेत, असे निर्देश केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, लोकांच्या सोयीसाठी नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रियाही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोपी केली आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं रिन्यूअल तुम्ही 60 दिवस आधी अॅडव्हान्समध्ये करु शकता. तसेच टेम्पररी रजिस्ट्रेशनसाठी वेळीची मर्यादाही आता 1 महिन्यावरुन वाढवून 6 महिने करण्यात आली आहे.

Advertisement

Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही आता काही बदल करण्यात आले आहेत. आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्याही करु शकणार आहात. कोरोना काळात संबंधित मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

Advertisement

वाहनपरवाना रिन्यू कसा कराल ?

Advertisement

– ड्रायव्हिंग लायसन्स आता ऑनलाईन पद्धतीनेही रिन्यू करता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.
– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

– नंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.

Advertisement

– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

Advertisement

वोडाफोन-आयडियाचा पाय आणखी खोलात, कुमार मंगलम् बिर्ला यांनी घेतला टोकाचा निर्णय, ग्राहकांचे काय होणार..?
ऑनलाईन शाॅपिंग करताना ही काळजी घ्या, नाहीतर बसू शकतो खिशाला फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply