Take a fresh look at your lifestyle.

अर्रे.. येतोय की मनोरंजन जगतात आणखीही एक पर्याय; मराठीसह प्रादेशिक भाषेतील कार्यक्रम पाहण्याची संधी देणार हे ओटीटी

पुणे : मराठीतील आघाडीचा चित्रपट अभिनेता स्वप्निल जोशी आणि उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म दाखल करत आहेत. भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम यावर मोठ्या प्रमाणावर दाखवले जातील.

Advertisement

स्वप्निल जोशी हे चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक ओटीटी व्यासपीठ सुरू करण्याचे नियोजन केले होते. दीड वर्षे हे काम सुरु होते. त्याचवेळी फिरोदिया हेसुद्धा मराठी, गुजराती आणि इतर भाषांमधील कार्यक्रमासाठी ओटीटी प्लटफॉर्म असावा यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी तशी घोषणाही केली होती. नंतर हे दोन्ही एकत्र आलेले असून त्यांनी एकत्रितपणे नवीन ओटीटी व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

Advertisement

“एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते. दरम्यानच्या काळात, या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वचपातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले,” असे उद्गार स्वप्निल जोशी यांनी काढले.

Advertisement

स्वप्निल पुढे म्हणाले की, दोन मोठी नावे एकत्र येत असल्याने दाखल होणारा ओटीटी हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरु होणार असून तो जागतिक स्तरावर कार्यरत असेल. केवळ भारतातील प्रादेशिक भाषाच नव्हे, पण अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा पुढे जाऊन या व्यासपिठावर दाखल होणार आहेत, असेही ते म्हणाले. “एक जागतिक स्तरावरील कंपनी सुरु होईल, या उद्दिष्टाने खूप चांगल्या लोकांचा चमू यासाठी एकत्र आला आहे. या उपक्रमाचे नाव काय असेल, त्याचा शुभारंभ कधी होईल, त्या सगळ्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे,” ते म्हणाले.

Advertisement

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की,एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वप्निल आणि त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर हे व्यासपीठ सुरु करायचे असे ठरवले. “लॉकडाऊनमध्ये कित्येक ओटीटी प्लटफॉर्म सुरु झाले आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यावर दाखवले जात आहेत. ओटीटीवरील कॉन्टेटसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. या व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आम्ही ‘लेट्सफ्लिक्स’सुरु करायचे ठरवले. भारतीय भाषांमधील चित्रपट, मालिका, कार्यक्रम त्यावर दाखाविण्याचा विचार होता. पण ‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु असतना तशाचप्रकारचा विचार स्वप्निल जोशी करत असल्याचे मला समजले. मग आम्ही भेटलो आणि मग विचार पक्का झाला की, एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित येऊन अधिक भव्य प्रमाणात ओटीटी व्यासपीठ सुरु करायचे,” ते म्हणाले.

Advertisement

नरेंद्र फिरोदिया पुढे म्हणाले, “आम्ही हा ओटीटी भव्य प्रमाणावर दाखल करत आहोत. त्याचा फायदा सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना होणार आहे. आमच्या प्रेक्षकांना भारतीय भाषांमधील दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आमचा मानस आहे. हा खऱ्या अर्थाने ‘भारताचा ओटीटी’ असेल आणि आम्ही त्याच दृष्टीने नियोजन करत आहोत. या प्लटफॉर्मबद्दलची अधिक माहिती आम्ही लवकरच घोषित करणार आहोत.”

Advertisement

Advertisement

Leave a Reply