Take a fresh look at your lifestyle.

आणि आमदार लंकेंनी केली आरोग्य कर्मचाऱ्याना मारहाण; पहा नेमके काय म्हटलेय ‘त्या’ पत्रात

अहमदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी दबंगगिरी केल्याचे पत्र ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पाठवले आहे. लंके यांनी याबाबत अजूनही अधिकृतरीत्या प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ते काय बोलणार आणि या प्रकरणाचे पुढे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

वैदयकिय अधीक्षकांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, पारनेर ग्रामीण रूग्णालय येथे बुधवार दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता लसीकरणाच्या टोकणचे वाटप करण्यासाठी तहसिलदार आणि डॉ. आडसुळ यांच्या आदेशानूसार लसीच्या लाभार्थ्यांना टोकणचे वाटप करण्यात आले. तसेच रात्री साडेदहा वाजता आमदार नीलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल दिलीप पाटील यांना घरून बोलावण्यात आले व त्यांच्यावरती टोकण विकण्याचे आरोप करून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमदार नीलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली.

Advertisement

Advertisement

रूग्णालयात कार्यरत असणार्‍या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. अडसुळ यांना शिवीगाळ करण्यात आली, असेही पत्रात म्हटलेले आहे. आपल्या वेगळ्या स्टाईलने काम करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या लंके यांच्या या बातमीने सध्या चर्चेला उधाण आलेले आहे. याप्रकरणी आता आमदार लंके काय प्रतिक्रिया देतात आणि पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच मारहाण केल्याचा उल्लेख असलेले पत्र पारनेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना दिलेले आहे. ग्रामीण रूग्णालयातील कनिष्ठ लिपीकास लसीकरणाचे टोकण विकत असल्याचा आरोप करत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लंके यांनी मारहाण केल्याचे हे प्रकरण आहे. बुधवार दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली असल्याचे पत्रात म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply