Take a fresh look at your lifestyle.

‘वोडाफोन-आयडिया’चा पाय आणखी खोलात, कुमार मंगलम् बिर्ला यांनी घेतला टोकाचा निर्णय, ग्राहकांचे काय होणार..?

मुंबई : ‘वोडाफोन-आयडीया’ सध्या प्रचंड आर्थिक संकाटात सापडले आहे. सततचा तोटा आणि एजीआर शुल्क थकबाकीची टांगती तलवार, यामुळे भारतातील सेवा बंद करण्याच्या विचारापर्यंत कंपनी व्यवस्थापन आले आहे. त्यात ‘वोडाफोन-आयडिया’ची पालक कंपनी असलेल्या ब्रिटनमधील वोडाफोन ग्रुपनेही नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिलाय.

Advertisement

संकटात सापडलेल्या ‘वोडाफोन-आयडिया’चा पाय आणखी खोलात गेला आहे. कंपनीचे भारतातील अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे कंपनीच्या संकटात आणखी भर पडली आहे. संचालक मंडळानेही बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळविले.

Advertisement

देशातील वोडाफोन-आयडियाची सेवा अखंडित सुरु राहावी, कंपनीच्या २७ कोटी ग्राहकांच्या काळजीपोटी कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःचा २७ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. मात्र, आता त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने कंपनी व्यवस्थापन अडचणीत आले आहे. बिर्ला यांच्या जागी आता बिगर कार्यकारी संचालक हिमांशू कपाडिया यांना हंगामी बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

कंपनीवरील आर्थिक संकट दूर व्हावे, यासाठी कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःची २७ टक्के हिस्सेदारी विक्री करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, तूर्त तरी केंद्र सरकारने या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बिर्ला यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ब्रिटनमधील वोडाफोन ग्रुपनेही नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘वोडाफोन-आयडीया’चे आणि पर्यायाने ग्राहकांचे भवितव्य डळमळीत झाले आहे.

Advertisement

‘वोडाफोन-आयडिया’चे शेअर घसरले
‘वोडाफोन-आयडिया’चे बाजारी भांडवल जवळपास २४००० कोटी रुपये आहे. मागील काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. याच स्पर्धेमुळे काही वर्षांपूर्वी वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या होत्या. मात्र तरीही सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर यामुळे वोडाफोन-आयडियाची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. कंपनीच्या शेअरने भांडवली बाजारात सपाटून मार खाल्ला आहे.

Advertisement

बाबा रामदेव सुरु करणार नवा व्यवसाय, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा, कसा तो तुम्हीच पाहा..?
शेअर बाजारात तेजी परतली..! सेन्सेक्स-निप्टीची घोडदौड सुरु, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply