Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात घसरण, चांदीही उतरली..! गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी, पाहा सराफ बाजारातील स्थिती..

नवी दिल्ली : कोरोना संकटात सोन्याच्या दरात चढउतार सुरुच आहेत. जगभर व्हॅक्सिनेशन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर चढउतार मोठ्या प्रमाणात होत आहेत. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आजही (गुरुवारी) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरमधील सोन्याचे दर आज सकाळी साडेनऊ वाजता 0.09 टक्क्यांनी घसरुन 47,847 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.19 टक्क्यांची घसरण होऊन 67,471 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. स्पॉट गोल्ड 0110 GMT च्या घसरणीनंतर 0.1 टक्क्याने कमी होऊन 1,810.50 डॉलर प्रति औंस झाले होते. अमेरिकन वायदे बाजारात सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरुन 1,812.40 डॉलरच्या आसपास बंद झाले.

Advertisement

चांदीच्या दराने काल (बुधवारी) तीन आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज 0.1 टक्क्यांनी कमी होऊन 25.33 डॉलर प्रति औंसवर आले. गेल्या वर्षीच्या रेकाॅर्डब्रेक सोन्याच्या दराचा विचार केल्यास 8200 रुपयांनी सोने स्वस्त असल्याचे दिसते.

Advertisement

देशांतर्गत बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 10 रुपयांच्या घसरणीमुळे 46,950 रुपये प्रति तोळा झाले, तर चांदीचे दर 400 रुपयांनी वाढून 68,000 रुपये प्रति किलोवर होते. मुंबईत सोन्याचे दर 46,950 रुपये प्रति तोळा होता. नवी दिल्लीमध्ये हा दर 47,040 रुपये प्रति तोळा, तर चेन्नईत 45,330 रुपये प्रति तोळा दराने सोने विकले जात होते. 24 कॅरेट सोन्याचा दर आज 47,950 रुपये प्रति तोळा आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या जरी सोन्याच्या दरात चढ-उतार दिसत असले, तरी येत्या काळात हे दर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सध्याचा काळ गुंतवणुकदारांसाठी चांगला असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

शेअर बाजारात खरेदीचा ओघ कायम, सेन्सेक्स विक्रमी स्तरावर, भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
बिर्लांनी ‘त्या’ पत्रात म्हटलेय ‘असेही’; पहा मोदी सरकारला नेमके काय केलेय खोचक आवाहन..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply