Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चीनने केलेय पहिल्यांदाच ‘हे’ कृत्य; पहा नेमका काय इशारा असेल भारताला..!

दिल्ली : पाकिस्तान नि चीन या दोन शेजारी देशांच्या कुरापती भारतासाठी अडचणीच्या ठरत आहेत. देशात करोनाचे संकट असतानाच हे दोन्ही मुजोर देश काहीतरी काड्या करत राहतात. आताही चीनने असाच प्रकार केला आहे. त्याद्वारे भारताला नेमका काय इशारा देण्याचा प्रयत्न या मुजोर देशाचा आहे यावर चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

Advertisement

भारतीय सीमेवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या चीनने भारतीय सीमेवर प्रथमच बुलेट ट्रेनने सैनिक पाठवून आपली ताकद दाखवली आहे. सुमारे 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनने सैनिकांना तिबेटची राजधानी ल्हासा येथून भारताच्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ असलेल्या निंगची शहरात नेले.

Advertisement

चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये नव्याने भरती झालेल्या सैनिकांना नव्याने बांधलेल्या ल्हासा-निंगची रेल्वेने 4,500 मीटर उंचीवर व्यायामाच्या ठिकाणी नेले. पीएलएशी जोडलेल्या वेबसाइटनुसार, लष्कराच्या जवानांची ल्हासा-निंगची बुलेट रेल्वेमार्गे वाहतूक करण्याची ही पहिलीच वेळ होती. निंगची हे शहर भारताच्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ आहे आणि चीनसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

Advertisement

चीनने अलीकडेच तिबेटच्या दुर्गम हिमालयीन प्रदेशात पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन चालवायला सुरुवात केली आहे. ही ट्रेन प्रांतीय राजधानी ल्हासा आणि नियांगचीला जोडते. सिचुआन-तिबेट रेल्वेच्या 435.5 किलोमीटर लांबीच्या ल्हासा-न्यांगची विभागाचे उद्घाटन 1 जुलै रोजी सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) याच्या शताब्दी सोहळ्यापूर्वी करण्यात आले.

Advertisement

Eva 郑 عائشة on Twitter: “A combined arms brigade under PLA Tibet Military Command mobilizes new recruits on Lhasa to Nyingchi bullet train (160km/h) directly to the frontline, the 1st time the 435-km rail line to host troop transport mission. Nyingchi is home to the PLA 52nd Mountain Infantry Brigades. https://t.co/QsLMgVQ1Jo” / Twitter

Advertisement

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिका-यांना सिचुआन प्रांताला तिबेटमधील नियांगचीशी जोडणाऱ्या नवीन रेल्वे प्रकल्पाचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश दिले होते. ते म्हणाले होते की, नवीन रेल्वे लाईन सीमा स्थिरतेच्या सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका बजावेल. सिचुआन-तिबेट रेल्वे सिचुआन प्रांताची राजधानी चेंगडू येथून सुरू होईल आणि यानमधून जाईल आणि कामडो मार्गे तिबेटमध्ये प्रवेश करेल. ज्यामुळे चेंगदू ते ल्हासाचा प्रवास 48 तासांवरून 13 तासांपर्यंत कमी होईल.

Advertisement

नियांगची हे मेदोगचे प्रांतीय स्तरावरील शहर आहे. जे अरुणाचल प्रदेश सीमेला लागून आहे. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. जो भारताने स्पष्ट नाकारला आहे. भारत-चीन सीमा विवाद 3,488 किलोमीटर लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) आहे. चीनने भारताच्या सीमेवर आपली लष्करी तयारी खूप वेगाने वाढवली आहे. अनेक हवाई तळ बांधले गेले आहेत जिथे क्षेपणास्त्रे तैनात आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply