Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा बसलाय मार; शेतकऱ्यांची तरीही झालीय हार..! पहा काय आहे देशात परिस्थिती

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटापाठोपाठ महागाईने देशात हाहाकार उडवला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांनी महागाई काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शेतमालास मात्र भाव मिळत नसल्याने एकीकडे महागाईचा मार बसूनही त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याचे विदारक चित्र आणखी गंभीर होत आहे.

Advertisement

आरोग्याच्या संकटकाळात जवळपास सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे मात्र, महागाई कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत. मागील एक वर्षाच्या काळात कोरोनाने लोकांचे रोजगार हिसकावले. उद्योग-व्यवसायांचे कंबरडे मोडले. लोकांचे उत्पन्न घटले. तर दुसरीकडे महागाईत वाढ झाली. या एक वर्षाच्या काळात खाद्यतेल, डाळींच्या महागाईने घराचे बजेट पूर्णतः विस्कळीत केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत.

Advertisement

कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. इंधनाच्या दरात वाढ होत असल्यानेच देशांतर्गत महागाईत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरुनच देशात सध्या महागाई किती वाढली आहे, याचा अंदाज येतो. मागील 2 ऑगस्ट रोजी मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत 122.12 रुपये होती. आता 2 ऑगस्ट 2021 रोजी एक किलो मोहरीच्या तेलासाठी तब्बल 172.72 रुपये मोजावे लागत आहेत. सूर्यफूलाच्या तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. फक्त एकाच वर्षात सूर्यफूल तेलाचे दर 108 रुपयांवरुन 171 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पाम तेलाच्या किमतीही 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Advertisement

मागील वर्षात मूग डाळ वगळता सर्व प्रकारच्या डाळींचे दर वाढले आहेत. हरभरा डाळीचे भाव 65.86 रुपयांवरुन 75.60 रुपये झाले आहेत. उडीद डाळ 96.63 रुपयांवरुन 106.29 रुपये, मसूर डाळ 76.02 रुपयांवरुन 87.37 रुपये असे दर वाढले आहेत. एक वर्षाच्या काळात दुधाचे दर 5.55 रुपयांनी वाढले आहेत. चहा पावडरचे भाव 216 रुपयांवरुन 279.30 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. तर बटाटे आणि टोमॅटोचे दर मात्र या काळात वाढलेले नाहीत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply