Take a fresh look at your lifestyle.

भन्नाटच ऑफर की.. ‘इंडिया-गो’ इन एअर करण्यासाठी व्हा सज्ज; पहा कशी संधी आलीय चालून

दिल्ली : आता सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार होऊ शकते. कारण, इंडिगो या विमान कंपनीने अशीच एक भन्नाट ऑफर सुरू केली आहे की ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुद्धा विमानाने प्रवास करू शकतात. विमानाचा प्रवास म्हटला की खूप पैसे खर्च करावे लागतील असा विचार डोक्यात येतोच. मात्र, कंपनीने फक्त 915 रुपयात विमान प्रवासाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान ही योजना सुरू राहणार आहे. कंपनीने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे, की या ऑफर अंतर्गत तुम्ही 915 रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकता. 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 दरम्यान प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. देशातील आगरतळा, अहमदाबाद, आग्रा, औरंगाबाद, अमृतसर, बंगळुरू, बेळगाव, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोईम्बतूर, देहरादून यांसारख्या 63 शहरांमध्ये प्रवास करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. या ऑफर अंतर्गत प्रवाशांना HSBC क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सवलत मिळणार आहे. प्रवाशांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक ऑफर मिळेल.

Advertisement

दरम्यान, देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तर सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता विमानाने सुद्धा झटका दिला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना विमान प्रवासासाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. देशात आता इंधनाच्या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील महिनाभरात एव्हीएशन टर्बाइन फ्युएलचे दर जवळपास 9.30 टक्क्यांनी वाढले आहेत. देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तर सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता विमानाने सुद्धा झटका दिला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना विमान प्रवासासाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. देशात आता इंधनाच्या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील महिनाभरात एव्हीएशन टर्बाइन फ्युएलचे दर जवळपास 9.30 टक्क्यांनी वाढले आहेत. अशा परिस्थितीत माफक दरात विमान प्रवासाची ऑफर कंपनीने दिली आहे, हे विशेष आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply