Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजी परतली..! सेन्सेक्स-निप्टीची घोडदौड सुरु, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी काल (मंगळवारी) जोरदार कमाई केली होती. त्यामुळे सेन्सेक्स ८७३ अंकांनी वधारला, तर निफ्टीने १६००० अंकांचा टप्पा ओलांडला होता. या तेजीच्या लाटेत गुंतवणूकदारांची एकूण मालमत्ता २.३० लाख कोटींनी वधारली. तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आजही (बुधवारी) आपली घोडदौड कायम ठेवली. सेन्सेक्स ४८९ अंकांनी वधारत ५४३१२ अंकावर होता. निफ्टी १३७ अंकांनी वधारला असून. तो १६२६७ अंकावर आहे.

Advertisement

बाजारात सुरुवातीलाच झालेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारुन ५४ हजार अंकाच्या पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १३० अंकाची झेप घेतली. आजच्या तेजीमुळे सलग दोन सत्रांत गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटींची कमाई केलीय.

Advertisement

बँक, वित्त संस्था, आयटी, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी या क्षेत्रात आजच्या सत्रात खरेदीचा ओघ दिसला. सेन्सेक्स मंचावरील २३ शेअर तेजीत होते. त्यात टाटा स्टील, एचडीएफसी, इन्फोसिस, डॉ. रेड्डी लॅब, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टायटन, आयटीसी, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये वाढ झाली, तर एचयूएल, एसबीआय, टेक महिंद्रा,नेस्ले, भारती एअरटेल या शेअरमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

निफ्टीवर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झालीय. एसबीआय, टायटन, गोदरेज कंन्झुमर प्रॉडक्ट, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. जुलैमध्ये जीएसटी करात झालेली दमदार वाढ आणि औद्योगिक उत्पादनाने झेप घेतल्यानंतर गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास दुणावल्याचे दिसत आहे.

Advertisement

देवयानी इंटरनॅशनल, क्रस्ना डायग्नोस्टिक, विंडलॅब बायोटेक आणि एक्झारो टाईल्स या कंपन्यांचे आयपीओ आज खुले होणार होते. त्यामुळे प्राथमिक बाजारात आज गुंतणूकदारांसाठी खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.

Advertisement

चलन बाजारात मंगळवारी डॉलरच्या समोर रुपया ६ पैशांनी वधारला आणि तो ७२.२८ वर गेला. शेअर बाजारातील तेजीचा ट्रेंड पाहता डिसेंबरअखेर निफ्टी १८००० अंकांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Advertisement

मोदी सरकारने चीनला दिलेय ‘हे’..! पहा काँग्रेसने काय गंभीर आरोप केलाय नेमका
पेट्राल-डिझेलची दरवाढ कमी होणार नाही, मोदी सरकार करकपात करण्यास अनुत्सुक, नागरिकांचा खिसा खाली होणार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply