Take a fresh look at your lifestyle.

दुर्मिळ नाणी, नोटांच्या खरेदी-विक्रीच्या जाळ्यात अडकू नका, पाहा रिझर्व्ह बॅंकेने काय इशारा दिलाय..?

नवी दिल्ली : दुर्मिळ नाणी, नोटांच्या खरेदी-विक्रीबाबत सोशल मीडिया, तसेच काही माध्यमातूनही बातम्या प्रसिद्ध होत असतात. तुमच्याकडे अशी नाणी, नोटा असल्यास लाखो रुपये मिळतील, असे सांगितले जाते. मात्र, अशा बातम्यांपासून, जाहीरातीपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे, अन्यथा त्यात मोठी फसवणूक होऊ शकते. खुद्द रिझर्व्ह बॅंकेनेच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ग्राहकांना अशा गोष्टीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. जुन्या, दुर्मिळ नोटा वा नाण्यांच्या खरेदी-विक्रीच्या बनावट ऑफरला बळी पडू नका, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

Advertisement

‘आरबीआय’च्या नावाने काही जण ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारांत शुल्क किंवा कमिशनची मागणी करीत असतात. अशा जाळ्यात कोणीही अडकू नये, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

Advertisement

आपल्या पत्रकात ‘आरबीआय’ने म्हटले आहे, की जुन्या नोटा, नाणी विकण्यासारख्या कोणत्याही व्यवहारात आम्ही सामील नाही, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कमिशन किंवा पैसे घेतले जात नाहीत. ‘आरबीआय’च्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला, कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार दिलेले नाहीत.

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने अशा फी/कमिशन गोळा करण्यासाठी कोणत्याही संस्था/फर्म/व्यक्तींना नेमलेले नाही. अशा फसव्या ऑफरद्वारे पैशांची गैरव्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आरबीआयचे नाव वापरून फसवणूक करणाऱ्यांना बळी पडू नका, असा सल्लाही सामान्यांना मध्यवर्ती बँकेने दिलाय.

Advertisement

बाबा रामदेव सुरु करणार नवा व्यवसाय, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा, कसा तो तुम्हीच पाहा..?
शेअर बाजारात तेजी परतली..! सेन्सेक्स-निप्टीची घोडदौड सुरु, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply