Take a fresh look at your lifestyle.

राणेंनी शिवसेनेवर केलाय ‘तो’ गंभीर आरोप; पहा कशाबाबत केलीय त्यांनी सेनेवर टीका

मुंबई : शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते अजूनही संपुष्टात आलेले नाही. उलट दिवसेंदिवस हे नाते आणखी घट्ट होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करून सेनेला डिवचले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय??

Advertisement

Advertisement

तसेच आणखी एका पोस्टमध्ये राणेंनी म्हटलेय की, ‘गिव्ह अँड टेक‘ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक‘ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने. ठाकरे सरकारने नीचपणा जगात शिल्लक ठेवला नाही, सगळा वापरला.

Advertisement

दरम्यान, ‘काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, १० हजार रुपयांसाठी तडफडायला लावतायत. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला १० हजार पण एका झटक्यात नाही तर इंस्टॉलमेंट मध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी पण मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही’ असेही राणे यांनी म्हटलेले होते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply