Take a fresh look at your lifestyle.

झिका विषाणूबाबत ‘अशी’ घ्या काळजी; पहा कितपत आहे हा विषाणू जीवघेणा

पुणे : राज्यात करोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात अजूनही अपयश आलेले असताना झिका नावाच्या विषाणूबाबत बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. झिकाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळल्याने अनेकजण धास्तावले आहेत. त्यातच बातम्यांमधून येणारी माहिती त्यात भर टाकत आहे.

Advertisement

गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेशात झिकाबाधित रुग्ण सापडलेले आहेत.‘एडिस इजिप्ती’ डासापासून याची उत्पत्ती होते. अगदी डेंग्यू डासाचा जसा आपण बंदोबस्त करतो. त्याच पद्धतीने या आजारावर आपल्याला सर्वांना मिळून मात करावी लागणार आहे. घरामध्ये आणि कार्यालयात अशा डासांची निर्मिती होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. साठवलेल्या पाण्यात, डबक्यात, अस्वच्छ ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. झिका पसरवणारा डास मुख्यत: दिवसा चावत असल्याने याबाबत काळजी घ्यावी.

Advertisement

राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले आहे की, झिका आजार विषाणूजन्य असला तरी तो संसर्गजन्य, जीवघेणा नाही. या आजाराच्या मृत्यूची एकही नोंद अद्याप आपल्याकडे झालेली नाही. झिकाची लक्षणेही सामान्यत: फ्लूप्रमाणेच असतात. ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे जाणवतात. थकवा येतो. त्यावर पुरेसे पाणी पिणे, भरपूर विश्रांती घेणे आणि तापासाठी क्रोसीन घेतली तरी चालते.

Advertisement

पुरंदर तालुक्यातील झिकाचा रुग्ण असलेली महिला पूर्ण बरी झाली आहे. तिला कोणतीही लक्षणे आता नाहीत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही कुठलाही त्रास नाही. वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे, पण घाबरून जाऊ नका, असेही आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply