Take a fresh look at your lifestyle.

आठवडाभर ‘त्या’ भागात राहणार पावसाचा जोर; पहा नेमका काय आहे हवामान अंदाज

नाशिक : राज्यात मान्सून सक्रीय राहण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती नसल्यामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. परिणामी पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे कोकण वगळता राज्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता राहील असे हवामान विभागाला वाटत आहे.

Advertisement

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत फवारणी केल्याप्रमाणे पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी सध्या शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालकांकडे चकरा माराव्या लागत आहेत.

Advertisement

पुढील आठ दिवसात राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. मान्सूनचा आस नेहमीच्या स्थानावरून काहिसा उत्तरेकडे सरकल्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचे वितरण असमान राहिल्याने उत्तर महाराष्ट्र कोरडा तर कोकण व दक्षिण महाराष्ट्रात पाणीच पाणी अशी स्थिती सध्या राज्यात आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात जुलैमध्ये जोरदार पाऊस पडलेला नाही. मात्र, आता तीन ते सहा ऑगस्ट या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात या काळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply