Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात घसरण सुरुच, आता सोनेखरेदी करा नि ‘ईएमआय’द्वारे पैसे द्या..! कशी ते पाहा..

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सुरु झालेली घसरण आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही (ता.3) पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सकाळी 0.32 टक्क्यांनी सोन्याचे दर घसरले. नंतर ते 47,933 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. चांदीचे दरातही (Silver price) आज घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. चांदी 0.53 टक्क्यांनी कमी होऊन 67,528 रुपये प्रति किलोवर दर पोहोचला होता.

Advertisement

दरम्यान गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये याच काळात सोन्याचे दर जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर होते. त्याचा विचार केल्यास रेकॉर्ड लेव्हलपेक्षा आजही सोन्याचे दर 8,200 रुपयांनी कमी आहेत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारातही सकाळी ‘एमसीएक्स’वर सोन्याच्या भावात 0.017 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे दर 1810.70 डॉलर प्रति औंसवर आहेत, तर चांदीमध्ये 0.85 टक्क्क्यांची घसरण झाली. चांदी 25.29 डॉलर प्रति औंस स्तरावर होते.

Advertisement

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति तोळा)
मुंबई- 22 कॅरेट – 47,380 रुपये, 24 कॅरेट 48,380 रुपये
कोलकाता – 22 कॅरेट 47,400 रुपये, 24 कॅरेट – 50,100 रुपये
चेन्नई – 22 कॅरेट- 45,350 रुपये, 24 कॅरेट – 49,490 रुपये

Advertisement

EMI वर सोनेखरेदी करता येणार

Advertisement

आता तुम्हाला EMI वर सोनेखरेदी करता येणार आहे. तुम्हाला एखादा दागिना आवडला असेल, पण तो खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असतील, तर AUGMONT तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. त्यासाठी सुरुवातीला 20% डाउनपेमेंट भरावे लागेल. त्यानंतर तुमचा EMI किती होईल, ते निश्चित केले जाईल.

Advertisement

कॉस्ट ईएमआय पेमेंटच्या 10 दिवसांत डिलिव्हरी केली जाईल. कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी अशाप्रकारे EMI वर दागिने खरेदी करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. याकरता ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

Advertisement

नाशिकमधील सहकारी बॅंकेसह दोन बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा, 50 लाखांचा दंड.. पाहा कशामुळे केलीय कारवाई?
पेट्राल-डिझेलची दरवाढ कमी होणार नाही, मोदी सरकार करकपात करण्यास अनुत्सुक, नागरिकांचा खिसा खाली होणार..!
Blog : ..कोरोना.. म्युकर.. मी आणि ‘ते’ तीन महिने..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply