Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अॅपललाही दिलाय झटका..! पहा कोणत्या स्मार्टफोन कंपनीने निर्माण केलाय जगात दबदबा

दिल्ली : आताही मोबाइलच्या दुनियेत जगात चीनी कंपनी शाओमीने जगात दबदबा निर्माण केला आहे. जगातील दिग्गज कंपनी असलेल्या अॅपललाही त्यांनी पछाडले आहे. त्यानंतर आता या कंपनीने भारतातसुद्धा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. भारतातील स्मार्टफोन बाजाराबाबत काउंटरपॉइंटचा अहवाल समोर आला आहे. या रिपोर्टनुसार या वर्षातील एप्रिल ते जून महिन्यात ‘ओप्पो एफ 19 प्रो प्लस’ हा बेस्ट सेलिंग 5 जी स्मार्टफोन ठरला आहे.

Advertisement

सन 2020 आणि 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉकडाऊन होते. त्याचा फटका मोबाइल कंपन्यांना बसला. त्यानंतर मात्र परिस्थिती सुधारली आहे. ओप्पो कंपनीस ई स्टोअर सुरू करण्याचाही फायदा मिळाल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र त्याचा व्यापारावर परिणाम झालेला नाही. जूनच्या तिमाहीत चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारताच्या बाजारपेठेतील 79 टक्के हिस्सा काबीज केला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 10 चिनी स्मार्टफोनपैकी 8 स्मार्टफोन विकले गेले आहेत. बाजार संशोधन संस्था काउंटरपॉईंटने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सध्या भारतात शाओमी कंपनी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, या कंपनीने सॅमसंग या दिग्गज कंपनीला सुद्धा मागे टाकले आहे.

Advertisement

या काळात शाओमीचा मार्केट शेअर 28.4 टक्के होता. यात शाओमीच्या सब-ब्रँड पोको स्मार्टफोनच्या शिपमेंटचादेखील समावेश आहे. सॅमसंग 17 टक्क्यांसह श्याओमीनंतर भारतातील दुसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी आहे. देशातील आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये सॅमसंग वगळता बाकी 4 कंपन्या चीनच्या आहेत. शाओमी 28.4 टक्के, सॅमसंग 17.7 टक्के, विवो 15.1 टक्के, रियलमी 14.6 टक्के आणि ओप्पो 10.4 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारतातील 5 जी स्मार्टफोनची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. जूनच्या तिमाहीत 5 जी स्मार्टफोनचा बाजारातील हिस्सा सुमारे 14 टक्के होता. 5 जी स्मार्टफोनच्या बाबतीत रिअलमी भारताचा अव्वल स्मार्टफोन ब्रँड ठरला आहे. त्याचा बाजारातील हिस्सा सुमारे 23 टक्के आहे. यानंतर वनप्लसचा नंबर आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, व्हिवो ब्रँड स्मार्टफोन 15,000 ते 20,000 रुपयांच्या किंमतीत सर्वाधिक पसंत केले गेले आहेत. तर सॅमसंग स्मार्टफोनला 20 ते 30 हजार रुपयांच्या किंमतीत प्राधान्य दिले जाते. वनप्लस स्मार्टफोन 30,000 रुपयांपेक्षा 34% कमी किंमतीसह बाजारपेठेवर कब्जा केला आहे. जून 2021 च्या तिमाहीत भारताच्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 82 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply