Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमधील सहकारी बॅंकेसह दोन बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेचा बडगा, 50 लाखांचा दंड.. पाहा कशामुळे केलीय कारवाई?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे पालन न केल्याने नाशिकमधील एका सहकारी बँकेसह गाझियाबादमधील बँकेवर ‘आरबीआय’ने (RBI) कारवाईचा बडगा उगारला. केंद्रीय बँकेने या बँकांवर 3 लाख ते 50.35 लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली आहे.

Advertisement

नाशिक येथील जनलक्ष्मी सहकारी बँक व गाझियाबादमधील नोएडा कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या काही नियमांचे पालन न केल्याने नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेला तब्बल 50.35 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement

‘प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांद्वारे अन्य बँकांमध्ये जमा रकमेचं नियोजन’ आणि ‘क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांची (ICC) सदस्यता’ यासंदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँक इंडियाने जनलक्ष्मी सहकारी बँकेला हा दंड केला आहे.

Advertisement

तसेच, गाझियाबादच्या नोएडा कमर्शिअल सहकारी बँकेलाही 3 लाखांचा दंड केला आहे. संचालकांशी संबंधित कर्ज आणि व्यवसायाची नवीन ठिकाणे उघडण्यासंदर्भात तरतुदींचे पालन न केल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. 31 मार्च 2019 रोजी सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीसंदर्भात अहवालाच्या आधारे या बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement

आरबीआयने म्हटले आहे, की नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित हा दंड आहे. दोन कर्जदात्यांद्वारे त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही कराराची किंवा व्यवहाराची वैधता स्पष्ट करणे असा याचे उद्दिष्ट्य नाही आहे.

Advertisement

मोदी सरकारने चीनला दिलेय ‘हे’..! पहा काँग्रेसने काय गंभीर आरोप केलाय नेमका
पेट्राल-डिझेलची दरवाढ कमी होणार नाही, मोदी सरकार करकपात करण्यास अनुत्सुक, नागरिकांचा खिसा खाली होणार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply