Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने चीनला दिलेय ‘हे’..! पहा काँग्रेसने काय गंभीर आरोप केलाय नेमका

दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला सीमा वाद अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर देशातील विरोधी पक्ष केंद्र सरकावर टीका करत असतात. आता काँग्रेसने या मुद्द्यावर केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. तसेच चीनने हजारो हेक्टर जमीन दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘मोदीजी आणि त्यांची चापलूसी करणाऱ्या मंडळींनी हजारो किलोमीटर भारतीय जमीन चीनला देऊन टाकली आहे. आम्ही ते परत कधी मिळवणार आहोत ?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.

Advertisement

चीन आणि भारतात सध्या तणाव कमी झाला असला तरी पूर्णपणे मिटलेला नाही. कारण, चीन तर अधूनमधून त्रास देतच आहे. तणाव कमी करण्यासाठी एकीकडे चर्चा करत आहे तर दुसरीकडे भारता विरोधात कुरापती देखील सुरू आहेत. त्यामुळे चीनच्या या कृत्यांनी संभ्रम वाढला आहे. आणि तणावही कायम आहे. त्यामुळे विरोधी पक्ष केंद्र सरकारने या प्रकारणी ठोस धोरण स्विकारावे असे सांगत आहेत. राहुल गांधी यांनी मात्र केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, राहुल गांधी यांनी याआधी अनेक मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाबाबत काही सूचना त्यांनी केल्या होत्या. पण, सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिले नाहीत, तरी देखील राहुल गांधी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत.. देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. केंद्रीय मंत्रीच तसे सांगत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply