Take a fresh look at your lifestyle.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी राहा तयार; ‘तिथे’ पाहता येणार तत्काळ निकाल..!

पुणे : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल लागल्यावर आता बारावीच्या निकालाचे वेध महाराष्ट्राला लागले होते. त्यानुसार आता आज दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर होत आहे. त्यासाठीची तयारी झालेली आहे.

Advertisement

बारावीचा राज्य बोर्डाचा निकाल मंगळवारी (दि.३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर होणार असून दहावीच्या निकालाच्या वेळी बोर्डाच्या संकेतस्थळाची झालेली अडचण लक्षात घेत, बारावीच्या निकालासाठी ४ संकेतस्थळे बोर्डाने जाहीर केली आहेत. गुणदान विचारात घेऊन विहित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे.

Advertisement

यासाठी दहावीच्या बोडार्च्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापानातील विषयनिहाय गुण, बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या व तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुणे तसेच बारावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण, यांच्या आधारे गुणदान करण्यात आले आहे.

Advertisement
या वेबसाईटवर निकाल पाहता येणार :
https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
https://hscresult.mkcl.org
https://mahresult.nic.in

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply