Take a fresh look at your lifestyle.

सोन्याची चमक उतरली..! चांदीच्या दरातही घसरण, सराफा बाजारातील आजचे भाव जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या तेजीला आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच ब्रेक बसला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज (ता. २) सोन्याचा दर (Gold rate) 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 47926 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला होता. चांदी 0.3 टक्के घसरणीसह 67865 रुपये प्रति किलोवर होती.

Advertisement

मागील सत्रात सोन्याच्या दरात जवळपास 400 रुपये, म्हणजेच 0.75 टक्क्यांची घसरण झाली होती. चांदीच्या दरातही 0.5 टक्के घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली.

Advertisement

मागील वर्षी 2020 मध्ये MCX वर याच काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेलेला होता, तर आज सोन्याचा दर 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत उच्चांकी दरापेक्षा सोने अद्याप 8274 रुपये स्वस्त आहे.

Advertisement

दरम्यान, आता Augmont कडून EMI वर सोनं खरेदीचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी सुरुवातीला 20 टक्के डाउन पेमेंट भरावं लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर EMI फिक्स्ड होतो. त्यासाठी ग्राहकांना कोणतीही अॅडिशनल कॉस्ट भरावी लागत नाही.

Advertisement

घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीचा दर आता जाणून घेता येणार आहे. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. त्यात सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिलेली असेल

Advertisement

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने एक App तयार केलं आहे. ‘BIS Care app’ असे या App चं नाव असून, ग्राहक त्याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. शिवाय यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही..! मोदी सरकारचा निर्णय, शेतकरी कर्जमाफीबाबत पाहा काय म्हटलेय..?
तलाठ्यांना मिळणार आराम; पहा ई-पिक पाहणीचा नेमका काय होणार शेतकऱ्यांना फायदा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply