Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कोल्हापूर, सातारा, सांगलीला पुराचा वेढा; पहा प्रशासनाने नेमका काय केलाय बट्ट्याबोळ..!

कोल्हापूर : कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील महापुराच्या संकटापुढे अवघी सरकारी यंत्रणा हतबल झाल्याचे अवघ्या जगाने पाहिले आहे. प्रतिवर्षी या भागात कुठे ना कुठे असे महापूर येऊन हजारो कोटींचे नुकसान होते. आताही असाच प्रकार झाल्याने अनेक कुटुंबीय उघड्यावर पडलेले आहे. दरम्यान, महापुराला अस्मानी संकट कारणीभूत असले तरीही प्रशासनाची भूमिका आणि राष्ट्रीय जल आयोगाने सुचवलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे प्रकरण जबाबदार असल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

Advertisement

पाण्याचे राजकारण या जीवघेण्या खेळास जबाबदार ठरलेले आहे. राष्ट्रीय जल आयोगाने सुचवलेल्या तत्त्वापेक्षा जुलै महिन्याअखेर कित्येक पटीने अतिरिक्त पाणीसाठा करण्याचे धोरण या महापुरास मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी विजय दिवाण यांनी म्हटलेले आहे की, केंद्रीय जल आयोगाने सुचवलेल्या ३१ जुलैअखेर धरणाच्या क्षमतेचा ५० टक्के पाणीसाठा ठेवणे आणि १५ सप्टेंबरपर्यंत धरण पूर्णक्षमतेने भरणे या नियमाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Advertisement

त्यांनी पुढे दिव्य मराठीशी बिलाताना म्हटलेले आहे की, ऑगस्टअखेर व सप्टेंबर महिन्यात पाऊसमान कमी झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने न भरल्यास सर्वसाधारणपणे एक हजार मेगावॅट वीज विकत घ्यावी लागल्यास ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. परंतु महापुरामुळे होणारे तीन हजार कोटींचे आर्थिक नुकसान टळेल. एकूणच नुकसान नेमके कशाने होते आणि कसे टाळले जाईल या मुद्द्यावर काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

Advertisement

कोयना, धोम, कण्हेर, राधानगरी, वारणा व दूधगंगा या धरणात जुलै महिन्याअखेर राष्ट्रीय जल आयोगाने सुचवलेल्या तत्त्वापेक्षा जास्त पाण्याची साठवणूक केल्याने मग जास्त पाउस झाला की या भागावर महापुराचे संकट कोसळते. ३१ जुलै रोजी कोयना धरणात ५० टक्के पाणीसाठा करणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात २५ जुलैला कोयना धरणात तब्बल ७७ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळेच या कालावधीत सुरू असलेल्या धुवाधार पावसातही कोयनेतून ५० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करावा लागला.

Advertisement

एकूणच वीज आणि शेतीसाठी आपल्यालाच पाणी मिळाले पाहिजे याचा अट्टहास करून या विविध धरणात पाण्याचा साठा ठेवला जातो. मग जोरात पाऊस सुरू झाल्यावर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तसेच नद्यांच्या खोऱ्यात इतर भागात जोराचा पाऊस होत असल्याने मग तेही पाणी नदीच्या पात्रात येऊन महापुराचे संकट निर्माण होत असल्याचेच अनेक तज्ञांचे मत आहे. आता यावर काहीतरी कार्यवाही होणार की, पांघरून टाकले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply