Take a fresh look at your lifestyle.

राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर; पहा कोणी मिळवले पहिले बक्षीस

वैष्णवी मुखेकर व सृष्टी पाटणकर यांचे भजन स्पर्धेत यश; श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे ऑनलाइन राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे निकाल जाहीर

अहमदनगर : आषाढीवारी निमित्त श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानच्यावतीने ऑनलाईन राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकुण 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला असून यामध्ये मोठ्या गटात वैष्णवी मुखेकर तर लहान गटात सृष्टी पाटनकर यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे.

Advertisement

ताल,स्वर,लय, सादरीकरण व व्हिडीओ क्वॉलीटी यांच्यासाठी 50 गुण व दर्शकांमधून मिळणार्‍या ऑनलाईन लोकप्रियतेसाठी 50 गुण अशी एकुण 100 गुणांची स्पर्धा घेण्यात आली. परिक्षकांच्या पडताळणीनंतर हा निकाल जाहिर करण्यात आला. प्रतिष्ठाणच्या वतीने हा निकाल प्रसिद्धीस देण्यात आला.

Advertisement

मोठ्या गटातून संदिप राजाराम माने (आष्टी) द्वितीय, माधुरी राजेंद्र बनसोडे (मेहेकरी, ता.आष्टी) तृतीय क्रमांकाच्या पारितोषीकांचे मानकरी ठरले आहेत. लहान गटातून भाग्यश्री खानोदे (यवतमाळ) द्वितीय, मधुरा दत्तात्रय झांबरे (सोलापूर) तृतीय बक्षिसाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व मानपत्राचे वितरण बुधवार दि. 4 रोजी संत शिरोमणी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र वाहिरा, ता.आष्टी, जि.बीड. येथे सकाळी 7 वा. महाआरतीनंतर करण्यात येणार आहे. मोठ्या गटात ओम राजेंद्र उल्हारे व उद्धव जर्‍हाड तर,  श्रावणी नारायण थोरवे व  वैशाली दीपक ढगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत.

Advertisement

कोरोनाच्या संकटांमुळे केवळ मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके, धनादेश व मानपत्र पोस्टाच्या सहाय्याने किंवा डिजीटल स्वरुपात पाठविण्यात येईल अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी दिली आहे.

Advertisement

संगीत स्पर्धेत संगीत अलंकार आशुतोष खराडे, संगीत विशारद शिवाजीराव शिंदे,  ह.भ.प.प्रा.विठ्ठल गुंड महाराज, प्रतिष्ठाणचे सहसचिव सदाशिव पगारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रतिष्ठानचे सचिव किसन आटोळे यांनी सहभागी स्पर्धक व परीक्षकांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement

Leave a Reply