Take a fresh look at your lifestyle.

नगर, पुण्यासह 11 जिल्ह्यांत कोरोनाचे निर्बंध कायम, 25 जिल्ह्यांत शिथीलता.. नवी नियमावली जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यांत मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे, तर 11 जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे अद्याप महाराष्ट्रात पूर्णत: लॉकडाऊन हटविण्यात आलेला नाही.

Advertisement

राज्य सरकारने ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे ठेवण्यात येणार आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे.

Advertisement

इतर जिल्ह्यांना मात्र काही प्रमाणात शिथिलता अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाची मोठी रुग्णसंख्या समोर आल्यानंतर इतर राज्यांना सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाही सण-उत्सव साजरा करताना निर्बंध असणार आहे.

Advertisement

अशी असणार नवी नियमावली?
1. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

Advertisement

2. सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
3. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

Advertisement

4. जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
5. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
6. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी

Advertisement

7. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
8. सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
9. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार

Advertisement

10. सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

Advertisement

11. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.
12. वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी

Advertisement

13. राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही..! मोदी सरकारचा निर्णय, शेतकरी कर्जमाफीबाबत पाहा काय म्हटलेय..?
ब्रेकिंग : अखेर बारावीचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहणार जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply