Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस ग्रोथसाठीही महत्वाचे आहे रिब्रँडिंग; वाचा व्यवसायासाठी महत्वाची माहिती

अनेकांना वाटते की, रिब्रँडिंग म्हणजे एखाद्या बिझनेस ट्रेडमार्कचे स्वरुप किंवा नाव बदलणे किंवा ब्रँडची ओळख बदलणे होय. पण असे नाही. हा सखोल मूलभूत बदल असतो, जो कंपनीच्या पावरहाऊसला नव्याने उभे करतो. नवी बिझनेस धोरणे आणि कॉर्पोरेट व्यक्तीमत्त्वाच्या मदतीने त्याचे नूतनीकरण केले जाते. ग्राहक, गुंतवणूकदार, कर्मचारी, प्रतिस्पर्धी आणि जनतेला याद्वारे संकेत मिळतात की, कंपनी आणि तिच्या ब्रँडने काही प्रमुख उद्दिष्टे साध्य केली आहेत. त्यापुढे जाण्याकरिता, सेवा आणि वस्तू अखंडपणे वितरीत करण्यासाठी बदल आवश्यक आहे, किंबहुना अनिवार्य आहे.

Advertisement

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी सांगतात की, या संपूर्ण कार्यात, ब्रँडची ओळख ही ग्राहकांचा अनुभव आणि कंपनीची बाजारातील धारणा यावर संपूर्णपणे अवलंबून असते. संस्थेसाठी फायदेशीर, विश्वासार्हता आणि ब्रँडची मूल्ये स्थापित करण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त असली तरीही भविष्यातील वृद्धीरकरिता ती अडथळाही बनू शकते.

Advertisement

एखाद्या कंपनीने रिब्रँडिंग कधी करावे?: रिब्रँडिंग हे कौशल्यपूर्ण काम असून पूर्वविचार आणि दृष्टीकोनासह अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. रिब्रँडिंगमध्ये ब्रँड लोगो, कंपनीची ओळख तसेच कंपनीची मूल्ये संपूर्णपणे बदलणे आवश्यकच असते, असे नाही. कंपनीच्या भविष्यातील वृद्धीशी सुसंगत असलेल्या कल्पना आणि मूल्य प्रणाली कायम ठेवली पाहिजे. कंपनीच्या तत्त्वांवरही शक्य असल्यास भर दिला पाहिजे.

Advertisement

कंपनीची जुनी ब्रँड ओळख कंपनीच्या तत्त्वांना पूर्णपणे आत्मसात करत नसेल किंवा त्यात ऊर्जा भरत नसेल तरच व्यवस्थापकीय नेतृत्वाने रिब्रँडिंग करून घ्यावे. तसेच ब्रँडच्या प्रतिमेला एक उत्साह आणि ऊर्जेची गरज असते, ती ब्रँड लोगोतून मिळवता येते. अखेरीस, कंपनीचे बिझनेस धोरण आणि मार्केटिंग कँपेन हे नव्या ब्रँड प्रतिमेशी सुसंगत असावे. रिब्रँडिंग आणि मार्केटिंग धोरणाच्या आकलनातील अगदी लहान फरक किंवा मतभेद विनाशकारी परिणाम करू शकतात. परिणामी ग्राहकवर्गाचे प्रमाण कमी होते, हे सांगण्याची गरज नाही.

Advertisement

नव्या युगासाठी रिब्रँडिंग: डिजिटल युग नवी भाषा बोलते. हे अत्यंत वेगवान, मोठ्या प्रमाणावर कनेक्टेड, त्वरित परिणामांना प्राधान्य देणारे आहे. या सुविधांना प्राधान्य दिल्याने मिलेनियअल्स अपडेटेड आणि आउटमोडेड यामधील फरक दर्शवू शकतात. या काळाच्या मागण्या मान्य करण्यापासून दूर असलेल्या कंपन्या कालांतराने व्यर्थ ठरतील. वर्षे सरत जातात, तसे ग्राहकांचे लोकसंख्याशास्त्र आणि स्वरुपदेखील बदलत जाते. एखाद्या कंपनीसाठी लक्ष्यित ग्राहक वर्गाला सहज समजेल, अशा पद्धतीने स्वत:चे सादरीकरण करणे, जास्त महत्त्वाचे असते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply