Take a fresh look at your lifestyle.

अखेर म्हणून मृत प्रेमीयुगुलाचे कुटुंबीयांनीच लावले लग्न; पहा काय घडलाय प्रकार

जळगाव : प्रेम म्हणजे प्रेम असते.. आणि बहुसंख्य प्रेमीयुगुलांना त्रास देण्याची प्रथाही सेम असते.. असाच प्रत्यय या भारत देशात वेळोवेळी येतो. कुटुंबियांचा इगो, जातीप्रथा, धार्मिकतेचे अवडंबर यात प्रेम हीच संकल्पना संकुचित झालेली आहे. मात्र, असाच विरोध करून आपले पाल्य गमावलेल्या कुटुंबियांना उपरती सुचली आणि त्यांनी मृत प्रेमीयुगुलाचे लग्न लावल्याची गोष्ट घडली आहे.

Advertisement

कुटुंबीयांनी प्रेमविवाहास नकार दिल्याने वाडे (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील एका प्रेमीयुगुलाने मैत्रीदिन या दिवशीच आत्महत्या केली. जिवंतपणी प्रेमविवाहास नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर मात्र या प्रेमीयुगुलाची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अग्निडाग देण्यापूर्वी स्मशानभूमीत विधिवत लग्न लावून दिल्याची बातमी दिव्य मराठीने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

मुकेश कैलास सोनवणे (२२, रा. वाडे) व नेहा बापू ठाकरे (१९, मूळ गाव पाळद, ता. मालेगाव, ह.मु. वाडे) असे मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. नेहा मामाच्या गावी वास्तव्यास असताना मुकेशशी तिचे प्रेमसंबंध जुळले. मुलाकडून मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्तावही ठेवण्यात आला. मात्र, मुलगा नात्याने चुलत मामा लागत असल्याच्या कारणाने नेहाच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला होता.

Advertisement

त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांकडून इतर ठिकाणी लग्नाची बोलणी सुरू झाल्यावर आता आपला प्रेमविवाह होणार नाही हे समजून घेऊन मुकेश व नेहा या दोघांनी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्यात लोखंडी सळईला दोरी बांधून रविवारी (१ ऑगस्ट) पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान आत्महत्या केली.

Advertisement

शवविच्छेदनानंतर मृतदेह वाडे गावात आणण्यात आले. त्यानंतर दोघांच्या घरून वेगवेगळी मात्र एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आले. दोघांची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर मृत्यूनंतर स्मशानभूमीत दोघांचे विधिवत लग्न लावून देण्यात आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी व पोलिस पाटील अरविंद पाटील यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply