Take a fresh look at your lifestyle.

तलाठ्यांना मिळणार आराम; पहा ई-पिक पाहणीचा नेमका काय होणार शेतकऱ्यांना फायदा..!

अहमदनगर : ‘कर्तव्यदक्ष’ सरकारी कर्मचारी म्हणून पहिला मान असलेल्या तलाठ्यांना आता आणखी आराम मिळणार आहे. त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतानाच शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल असे नवे मोबाईल ॲप्लिकेशन १५ ऑगस्टपासून शेतकरी सेवेत येत आहे. त्याचे नाव आहे ई-पिक पाहणी ॲप.

Advertisement

शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे यासाठी पिक नोंदणी हा घटक खूप महत्वाचा आहे. मात्र, उतारे आणि नोंदींचे पैसे खाण्यामध्ये वेळ जात असल्याने या महत्वाच्या कर्तव्याला बहुसंख्य तलाठ्यांनी हरताळ फसला आहे. अशाच ‘कर्तव्यदक्ष’ तलाठ्यांना हे कारकुनी काम यापुढे करू न देता शेतकऱ्यांना ही नोंद सुकर होण्यासाठी ई-पिक पाहणी ॲप येत आहे.

Advertisement

पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अप्लिकेशन निर्मिती करण्याचे मोठे कार्य केले आहे. टाटा ट्रस्टच्या सहायाने तयार केलेल्या या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकऱ्यांना पिकांची माहिती भरावी लागणार आहे. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाईम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होऊन पारदर्शकता येईल असे महसूल विभागाला वाटत आहे.

Advertisement

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या बनवण्यात आलेल्या आहेत. प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख (पुणे) यांच्या नियंत्रणाखाली याचे काम चालू झालेले आहे. यामुळे  शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे देखील सोईचे होईल. ई-पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन शक्य होणार आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply